Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

केंद्र सरकारच्या विरोधात मंठा येथे शिवसेनेचा भव्य सायकल मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला

मोदी सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणले:ए जे बोराडे

   मंठा/ अनिल बा खंदारे

मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील जनतेला ठेंगा दाखवला, केवळ अदानी अंबानी सारख्या बड्या उद्योगपतींना पोसणाऱ्या केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणले, पेट्रोल डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झालेच पाहिजेत अन्यथा गंभीर परिणाम केंद्र सरकारला भोगावे लागतील असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी दिला. केंद्र सरकारच्या विरोधात भव्य सायकल मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. मंठा फाटा येथून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयात विसर्जित करण्यात आला.
हेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान

यावेळी मोर्चाला संबोधित करताना जिल्हाप्रमुख श्री बोराडे बोलत होते, “जय भवानी – जय शिवाजी” शिवसेना जिंदाबाद, पेट्रोल डिझेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झालेच पाहिजेत, हा आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा गगनभेदी घोषणांनी शहर दुमदुमून गेले. मोर्चात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते, हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सायकली घेऊन मोर्चात सहभागी झाले .
हेही वाचामुख्यमंत्री शहरात येण्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक

सायकल मोर्चाने मंठेकरांचे लक्ष वेधून घेतले तहसील कार्यालय तहसीलदार सुमन मोरे यांनी निवेदन स्वीकारले, यावेळी शिवसेनेच्या वतीने त्यांना सायकल भेट देण्यात आली. कोरोनामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन उद्ध्वस्त झाले असताना मोदी सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प दिशाभूल करणारा असल्याचे जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी सांगितले. या मोर्चात माजी सभापती संतोष वरकड, बाजार समितीचे संचालक तथा शहरप्रमुख प्रल्हादराव बोराडे, नगराध्यक्ष नितीन राठोड, श्रीरंगअण्णा खरात, तालुकाप्रमुख अजय अवचार,

हेही वाचा मानवत माजी शहर प्रमूख राजेश कच्छवे यांच्या मार्गदर्शना खाले पेट्रोल, डिझल दर वाढीचा निषेध

युवा सेनेचे तालुकाप्रमुख डिगांबर बोराडे, जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड, पंचायत समिती सदस्य मधुकर काकडे, बाबाराव राठोड ,नगरसेवक इल्यास कुरेशी, अरुण वाघमारे, बालासाहेब बोराडे, प्रदीप बोराडे, नीरज सोमानी, विभागप्रमुख बबन शेळके, विष्णुपंत खराबे,बाबासाहेब राठोड, हरीभाऊ जाधव, दासोपंत खरात, रामेश्वर शिंदे, महादेव वाघमारे, संजय बोराडे, वजीर पठाण, भागवत चव्हाण,

संदीप बोराडे गुड्डू बोराडे नीलेश शिंगणे अशोक घारे, पवन मगर, राजू चव्हाण, शिवा बोराडे ,आदित्य चव्हाण ,सतीश राठोड, नितीन राठोड, नागेश सराफ, शरद मोरे, भारत राठोड, अनिरुद्ध काकडे, जमिर कुरेशी,युनुस कुरेशी,शमु  कुरेशी, सुनील वायाळ, आसाराम बोराडे, परमेश्वर उबाळे, राम उबाळे, गोपाल गायकवाड, पांडुरंग पारखे, प्रताप जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

बहिणी-बहिणीची शेती ! निसर्ग पुरक शेती :वाचा सविस्तर news

वाचा सविस्तर news शासकीय कला महाविद्यालयाचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

वाचा सविस्तर news पोलीस दलातील महिला बीट अंमलदार जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडतील :गृहमंत्री अनिल देशमुख


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close