Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल: संजय राऊत

मुंबईः ‘मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तुमच्यासारखे अनेक लोक पाहिले आहेत. मला तोंड उघडायला लावू नका. मी जर तोंड उघडलं तर भाजपच्या दिग्गज नेत्यांना देशाबाहेर जावं लागेल,’ असा गंभीर इशारा संजय राऊतांनी दिला आहे. त्याचबरोबर, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना इडीची नोटिस आल्यानंतर यासंदर्भात आज राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्ला चढवला आहे.

महाराष्ट्राचं सरकार टिकू देऊ नका असा इशारा भाजपचे नेते देत आहेत. तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका. हे सरकार आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाडायचं ठरवलं आहे, असं भाजप नेते म्हणत आहेत. बायकांच्या पदराआडून लढाईची मोहीम तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला आहे.

गेल्या वर्षभरात मी पाहतोय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, माझ्या नावाचा तुम्ही गजर करताय कालपासून यांना सातत्याने जे प्रमुख लोक आहेत, जे हे सरकार बनवण्यात आग्रही होते, राजकीय दृष्ट्या ते दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा हे असे नोटीस पाठवल्या जातात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close