Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये, अशोक चव्हाणांनी राऊतांना फटकारलं

मुंबई:- गेल्या काही दिवसांपासून यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत शिवसेनेकडून विविध सल्ले देण्यात येत आहेत. यातच खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे वक्तव्य केले होते.दरम्यान, काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत संजय राऊत यांचा विधानाचा समाचार घेतला आहे.
‘आम्ही शरद पवार यांचा आदर करतो. ते देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. पवार यांच्याविषयी काही बोलणे मला योग्य वाटत नाही. आपण यूपीएचे नेतृत्व करणार असल्याच्या वृत्ताचा दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच इन्कार केलेला आहे. यूपीएचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केलेले आहे असं चव्हाण म्हणाले.
महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तात चव्हाण म्हणतात,शिवसेनेशी आमची आघाडी केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असून, राज्यातील आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर झाली आहे. किमान समान कार्यक्रम प्रमाण मानून काँग्रेसने आघाडीचा महाराष्ट्रापुरता निर्णय घेतलेला आहे. शिवसेना अजूनही यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा सल्ला शिवसेनेने देणे उचित नाही, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांना फटकारले आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना शेतकऱ्यांचा प्रश्न अतिशय योग्य प्रकारे हाताळता येतात आणि काँग्रेस पक्ष देशाला योग्य दिशा देऊ शकतो, असं मत काँग्रेस नेते नसीम खान यांनी व्यक्त केले आहे.
याचसोबत युपीएच्या अध्यक्ष पदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिलेच सांगितले आहे की, अध्यक्ष बदलण्याची कुठलीही चर्चा किंवा परिस्थिती सध्या नाही आहे. त्यामुळे यावर शिवसेने आपली प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. महाराष्ट्रात कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत काँग्रेसने शिवसेनेला महाराष्ट्रात पाठिंबा दिला आहे. हे त्यांनी यूपीएचा भाग नसल्यामुळे या संदर्भात कुठलेही भाष्य करणे गरजेचे नाही.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close