Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

पहा आता कशी दिसते सलमानची पहिली पाकिस्तानी गर्लफ्रेंड, या अभिनेत्रीमुळे तुटले होते दोघांचे नाते !

पहा आता कशी दिसते सलमानची पहिली पाकिस्तानी गर्लफ्रेंड, या अभिनेत्रीमुळे तुटले होते दोघांचे नाते !
सोशल मीडियावर सलमान खानबद्दल विविध प्रकारच्या गोष्टी ऐकायला मिळतात. त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक बातम्याही व्हायरल झाल्या आहेत.

माघे सलमान खान आणि सोमी अलीच्या नात्याबद्दल बर्‍याच बातम्या आल्या होत्या. सोमी अली एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे जिने एका मुलाखतीत सांगितले की सलमान तिचा पहिला प्रियकर आहे. 2011 मध्ये दिलेल्या मुलाखतीत तिने याचा उल्लेख केला होता. सोमी अली मूळची कराची, पाकिस्तानची असून 1992 साली तिने बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला आणि काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. सोमी अलीने सलमान खानबरोबरही काम केलेले आहे.

सोमी अलीला सलमान खानशी लग्न करायचं होतं –

एका मुलाखतीत सोमी अली म्हणाली, “मी तरुण वयात असताना सलमानवर माझा क्रश होता.” मी अगदी लहान वयातच सलमान खानच्या प्रेमात पडले आणि मला सलमानशी लग्न करायचे होते. मी सलमानशी लग्न करता यावं म्हणून मी चित्रपटांमध्येही आले. ती सलमानला भेटली तेव्हा ती फक्त 15 वर्षांची होती. सलमान खाननेही माझ्यावर प्रेम करण्यास सुरूवात केली होती, असा दावा तिने केला होता.

डोळे मिटून मी सलमानवर विश्वास ठेवायचे असे सोमीने सांगितले. ती म्हणते की तिने सलमानला सहा वर्षे डेट केले आहे. सोमी अलीने सलमानचा 1989 मध्ये आलेला चित्रपट ‘मेने प्यार किया’ पाहिला आणि ती त्याची दिवाणी झाली होती आणि ति सलमानशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत होती.

सलमान आणि तिच्यामध्ये ऐश्वर्या आली होता –

सलमान आणि सोमी अलीची जोडी जास्त काळ टिकू शकली नाही. 2000 त्या दोघांचे ब्रेकप आहे आणि सोमी भारत सोडुन फ्लोरिडामये शिफ्ट झाली. दोघांचे ब्रेकअपमागे ऐश्वर्या राय हे कारण होते. या ब्रेकअप ला सोमी कोणालाच दोष देत नाही.एका मुलाखती दरम्यान सोमीने सांगितले होते की सलमान खान सोबत ब्रेकअप झाल्याने तिला त्याचे जास्त वाईट वाटत नाहीये. सलमान हा एक चांगला माणूस आहे, आणि माझ्या आयुष्यचा एक महत्वाचा भाग आहे, मला त्याच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले.

सोमी अलीने 10 चित्रपटमधे काम केले आहेत –

सोमी अलीने ‘अंत’, ‘किशन अवतार’, ‘तीसरा कौन’, ‘आंदोलन’ आणि ‘अग्निचक्र’ सारख्या सुमारे 10 चित्रपटमध्ये काम केलेआहे. सोमी अलीने सलमान खानबरोबर ‘बुलंद’ नावाच्या चित्रपटात देखील काम केले आहे परंतु हा चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झाला नाही. चित्रपटाची शूटिंग 80% पूर्ण झाली होती, परंतु काही पर्सनल कारणामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

भलेही हा चित्रपट रिलीज झाला नसेल परंतु या चित्रपटामुळे सलमान आणि सोमी एकदम जवळ आले होते. त्यांचे प्रेम वाढले होते. सोमी स्वतःला खूप नशीबवान समजते कारण तिच्या आयुष्यात सलमान आला. परंतु त्यांचे हे प्रेमप्रकरण जास्त काळ टिकले नाही.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close