Subscribe to our Newsletter
Loading
सामाजीक/विचार/सुविचार

पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर




करमाड/भानुदास मते

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त संतोष खेतमाळस पोलीस निरीक्षक करमाड यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२० बुधवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा *मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद* येथे संपन्न होणार आहे.माणुसकी चा चौथा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा- दुपारी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रत्त पेढि साठि- ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी नाव:- संतोष एकनाथ खेतमाळस शिक्षण :-एम टेक Dr ASCAE, Rahuri. सन सप्टेंबर 2006 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. पोस्टिंग :-गोंदिया, नक्सल ग्रस्त भाग, पुणे ग्रामीण, पुणे शहर, औरंगाबाद ग्रामीण मध्ये खुलताबाद, करमाड प्रभारी अधिकारी पो स्टे येथे 151 लोकांकडून रक्तदान शिबीर, जातीय सलोखा वाढवीने, माणुसकीची भिंत, दारू नको दुध प्या, तंटामुक्त बांध, वृक्षवल्ली आम्हाला सोयरे, व्यसनमुक्ती इ कार्यक्रम राबविले. Corona कालावधीत 1200 लोकांची स्वयंसेवी संस्थेमार्फत जेवणाची 3 महिने सुविधा, 800 लोकांना घरी जाण्यास मदत केली, 4 बसेस ची सुविधा, राशन वाटप इ.अश्या या आदर्श संतोष खेतमाळस साहेब पोलीस निरीक्षक करमाड पोलीस स्टेशन यांना माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कार निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यानी कळविले आहे.ह्या पुरस्काराबद्दल खेतमाळस साहेबांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close