Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

लातूर: संक्रांतीचे वाण पुस्तकांची देवाणघेवाण

लातूर- जिल्ह्यातील सारसा येथिल बाबुराव पंढरी भिसे यांच्या घरी महीलांनी संक्रांत तर साजरी केली पण ती गावात आदर्श एक निर्माण करणारी ठरली.संक्रांत म्हटलं की, तीळ गुळ घ्या गोड गोड बोला असं एकमोकांना म्हणून तिळगुळ एकमेकांच्या हातात देतात पण त्यापलीकडे का ? कोण गोड बोलत ? आणि इतरांनी आपल्याला गोड बोलण्याचीच अपेक्षा का धरावी ? गोड न बोललेलं बरं पण सत्य खरं आणि वास्तवावर बोलावं पण ते वास्ववादी बोलणारा समाज निर्माण करायचा असेल तर त्याची सुरूवात आपल्यासूनच करावी असा मनाशी निश्चय बाळगून सौ. कवीता पोपट भिसे, अनिता सुनिल भिसे व राजश्री अनिल भिसे या तिन्ही जावांनी मकरसंक्रांत साजरी करताना महीलांना प्लाटीक वस्तू वाण स्वरूपात न देता मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी जे छ. शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यावर लिहलेली पुस्तकं वाण म्हणून भेट दिली.भिसे कुटुंबातील महीलांनी वाण स्वरूपात पुस्तक भेट देण्याचा गावात जो एक नवा आदर्श निर्माण केला त्याच कौतुक बाबुराव पंढरी भिसे व पोपट बाबुराव भिसे यांनी केलं कारण घरातील पुरूष जर वैचारिक असतील तरच महीलांना अशी कार्य करता येतात आणि तसे भिसे कुटुंबीय आहेत. संक्रांतीचे वाण पुस्तकांची देवाणघेवाण ही संकल्पना स्वत:पासूनच गावखेड्यात सुरू केल्याबद्दल ‘संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू’ या पुस्तकाचे लेखक नवनाथ दत्तात्रय रेपे यांनीही यांचं खुप कौतुक केले

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close