Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

रोज🌹 नको गुलकंद द्या… गुलकंदाचे फायदे

रोज🌹 नको गुलकंद द्या…
गुलकंदाचे फायदे

आज रोज डे मी साजरा करणार नाही आणि तुम्ही देखील करू नका. परंतु जर तुमचं म्हणणं असेल की गुलाब देयला काय अडचण आहे तर आज घरी जाताना गुलाब आणि खडीसाखर घेऊन जा व ही पोस्ट देखील गुलाब देताना त्या व्यक्तीला शेअर करा…

आज मिळालेला गुलाब उद्या सुकून जाईल परंतु आपण या गुलाबाचे छानसे गुलकंद बनवा म्हणजे प्रेम पण वाढेल आणि आरोग्य देखील सुधारेल😀…

उन्हाळ्याचा होणारा दाह कमी करण्यासाठी डॉक्टर, वैद्य आवर्जून गुलकंद सेवनाचा पर्याय सांगतात.

गुलकंद बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. गुलाब पाकळ्या-2500 ग्राम
२. खडी साखर – 500ग्राम
आपण यात विलायची व सुखामेवा देखील चवीनुसार टाकू शकतो.
टीप:- यात आपण खडीसाखर आपल्या कमी करू शकता…
कृती:-
१. गुलाबाच्या लाल पाकळ्या वेगळ्या कराव्यात. पाकळ्यांचे बारीक तुकडे करावेत.
२. एक कमी जाडीचा थर खडीसाखर आणि एक थर गुलाबाच्या पाकळ्या अशा एकत्र काचेच्या बरणीत साठवून ठेवा. एका बरणीत एकावर एक ९ – १० थर होतील एवढी बरणी वापरावी.
३. काचेची बरणी कमीत कमी ५ दिवस तरी उन्हात ठेवावी. उन्हात ठेवल्यामुळे साखरेचे पाणी होते आणि गुलाबाच्या पाकळी मध्ये मस्त मुरते.
४. तीन आठवड्यानंतर गुलकंद खाण्यायोग्य बनतो.

गुलकंदाचे फायदे –
१. पचन क्रिया सुधारते –
गुलकंद खाल्ल्याने पचनक्रिया सुधारू शकते. तुम्हाला जर पोटाचे विकार, समस्या असतील तर गुलकंद तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल.
२. उष्णता कमी करते –
शरीरातील अनावश्यक उष्णता गुलकंद खाल्ल्याने कमी होते. उष्णतेच्या त्रासामुळे होणारे अनेक आजार , त्वचाविकार यामध्ये गुलकंद गुणकारी आहे.

Health Coach, Nutritionist & Dietician
Nilesh Pardeshi
whats app: 9822633270

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close