Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

फेब्रुवारी :रोमँटिक ‘प्रीतम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीलाफेब्रुवारी महिना आला कि प्रेमवीरांना वेध लागतात ते ‘व्हॅलेंटाईन डे’ चे. एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस जगभरात साजरा होतो. प्रेमाच्या या उत्सवाला आता थोडेच दिवस उरले आहेत. या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी भावनांच्या हिंदोळ्यावर प्रेमाची अनोखी सफर घडविण्यासाठी प्रीतम हा मराठी चित्रपट सज्ज झाला आहे. चित्रपटाचे रोमँटिक पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘प्रीतम’ चित्रपट येत्या १९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘विझार्ड प्रोडक्शन’च्या माध्यमातून ‘अॅड फिल्म मेकर’ सिजो रॉकी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

नजरेतून हृदयापर्यंतचा गोड प्रवास म्हणजे प्रेम. प्रेमाचा रंग वेगळा, गंध वेगळा, दृष्टी असूनही न दिसणारा,  प्रेमाचा अनुभव हा प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा असतो. अशाच वेगळ्या प्रेमाची अनुभूती घेऊन एका वेगळ्या रंगात रंगणारं प्रेम प्रीतम या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. ‘प्रेम सांगायचं नसतं ते मनात असावं लागतं’ हा विचार नकळतपणे हा चित्रपट देऊन जातो. कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर बहरणाऱ्या या प्रेमकथेत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही फ्रेश जोडी पहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत उपेंद्र लिमये, अजित देवळे, विश्वजीत पालव, समीर खांडेकर, आबा वेलणकर, शिवराज वाळवेकर, अस्मिता खटखटे, नयन जाधव, आनंदा कारेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत.

अव्यक्त प्रेमाची हळवी किनार दाखवणारे शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘तुझ्या रूपाचं चांदण सभोती’ हे प्रेमगीत सुद्धा गुरुवार १४ जानेवारीला मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार असून वेगवेगळ्या माध्यमातून या गाण्याचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. वाटा-आडवाटांवरचे निसर्गसौंदर्य, विस्तीर्ण व मनाचा ठाव घेणारे सागरकिनारे अशी कोकणातील विविध मनोहारी लोकेशन्स प्रीतम चित्रपटातून व गाण्यातही दिसणार आहेत. मनाचा ठाव घेणारं हे गाणं प्रत्येकाला आपल्या हृद्याच्या जवळचं वाटेल असा विश्वास दिग्दर्शक सिजो रॉकी व्यक्त करतात.

प्रीतम चित्रपटाची निर्मिती फैजल नितीन सिजो यांनी केली आहे. चित्रपटाची संहिता सुजित कुरूप, पटकथा-संवाद गणेश पंडित यांचे असून चित्रपटाची गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. पार्श्वसंगीत विजय गावंडे यांचे असून शंकर महादेवन, अभय जोधापूरकर, मनिष राजगिरे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. प्रोडक्शन डिझायनर संदीप रावडे असून कास्टिंग डायरेक्टर आणि वेशभूषेची जबाबदारी चैत्राली डोंगरे यांनी सांभाळली आहे. संकलन जयंत जठार तर छायांकन ओम नारायण यांचे आहे. संगीत विश्वजिथ सी टी यांचे तर नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार यांचे आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close