Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

रेनो इंडियाकडून क्विड’ने 3,50,000 विक्री टप्पा गाठल्याची घोषणा

मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक अशा दोन्ही पर्यायांत नवीन ‘आरएक्सएल’ 1.0एल पर्याय दाखल

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

नवी दिल्ली, 6 जुलै, 2020: रेनो इंडियाच्या वतीने त्यांचे प्रमुख उत्पादन क्विड ग्राहकांकरिता अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्यात आले आहे। त्यांचे नवीन आरएक्सएल वेरीयंटचा शुभारंभ बीएस6 सुसज्जित 1.0एल पॉवरट्रेनने युक्त असून एमटी आणि एएमटी आवृत्तीसह लॉन्च करण्यात आला। नवीन आरएक्सएल वेरीयंट हे अतिशय स्पर्धात्मक किंमतीत एमटीकरिता रु4.16 लाख आणि एएमटी प्रकारासाठी रु। 4.48 लाखात उपलब्ध करून देण्यात येतील। क्विड एएमटी 1.0एलमध्ये सहजरित्या उपलब्ध बीएस6 टू-पेडल पर्याय बाजारात दाखल होणार आहे।

भारतात क्विडने 3.5 लाखांचा विक्री टप्पा पार केल्याची माहिती दिली आहे। रेनो क्विडने लोकलायजेशन लेव्हल 98% पर्यंत गाठली असून हा विचारप्रवाह ‘मेक इन इंडिया’ प्रोग्रामला समर्पक आहे।

“रेनो क्विडचे ग्लोबल लॉन्च भारतात झाले असून यातून या देशाची ग्रुप रेनो’च्या वृद्धी आकांक्षेतील महत्त्वपूर्ण भूमिकेचे दर्शन घडते। क्विड हा भारतातील आमच्या प्रगतीमधील महत्त्वाचा सहयोगी आहे। सुमारे 3.5 लाखांहून अधिक क्विड कुटुंबांसह आम्हाला ग्राहकांनी भरभरून दाखवलेल्या खंबीर विश्वासाचा वर्षाव रेनो ब्रँडवर झाला आहे। क्विडचे अद्वितीय उत्पादन हे डिझाईन, कल्पकता आणि आधुनिकतेने-युक्त असून लॉन्च प्रसंगी आमच्याकरिता गेम चेंजर ठरले आहे,” असे रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम ममील्लापल्ले सांगतात।

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close