Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

मृदंग वाचा

मृदंग वाचा


 • निसर्गाने माणसाला आपल्या मनातील भाव व्यक्त करण्यासाठी व परस्परात संवाद साधण्यासाठी वाणी अथवा वाचा दिली आहे. काही व्यक्ती जे बोलतात ते सत्यात उतरते म्हणून त्याना वाचासीद्धी प्राप्त महानुभाव म्हणतात. समाजात एखादा महत्वाचा विषय चर्चेला आला की, त्यावर मत, मतांतरे घेतली जातात. कित्येक वेळा आपण एखाद्या विषयावर त्वरित मत मांडून मोकळे होतो. पण एखाद्या संवेदनशील विषयावर मत मांडताना आपली कसोटी पणाला लागते. यातून बरेच वेळा मत मांडणारा विषयी गैरसमज पसरतात.
  क्वचित प्रसंगी अशा व्यक्तिंचा प्रतिशोध घेण्याची भावना समाजात पसरते. कारण समाज सत्य पचवू शकत नाही.
  सन 1975 मध्ये मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रश्नी महाराष्ट्रातील जनता व लोकप्रतिनिधी यांचे मतांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यासाठी जी प्रश्नावली बनविण्यात आली होती. त्यात मराठवाड्याची आर्थिक व सामाजिक स्थिती कशी आहे याबाबतचे प्रश्नांचा उहापोह करण्यात आला होता. परंतू मुख्य प्रश्न नामांतर करावे की करु नये? हा होता. सर्वेक्षणात जनतेने आपली मते स्पष्ट हो किंवा नाही अशी निर्भीडपणे मांडली होती. परंतू लोकप्रतिनिधिनी मते मांडताना गोल-गोल उत्तरे दिली होती. फक्त गोविंदभाई श्रॉफ, बाबूराव आडसकर यांनी त्यांची मते स्पष्टपणे मांडून त्याचे समर्थनार्थ त्यानी आम जनतेचे मनोगत व निवेदन जोडले होते. या घटनेचा आपण शांतपणे त्रयस्थ व्यक्ती म्हणून साकल्याने विचार केला तर असे दिसून येईल की, काही विषय इतके संवेदनशील असतात की, त्यावर मत मांडणे जिकिरीचे होवून जाते. काही वेळा मत प्रदर्शनानंतर सामाजिक उद्रेक होऊन त्यातून दंगल व गंभीर मारामारिचे प्रकार घडत असतात. अशाच प्रकारातून काही मंत्री महोदयाचे घरावर हल्ले झाल्याचीही उदाहरणे घडली आहेत. त्यामुळे मते, प्रतिक्रिया देताना ती अतिशय सावधपणे द्यावी लागतात. काँग्रेस किंवा भाजप यापैकी कुणाचे सरकार जन हितकारी आहे ? या प्रश्नाचे उत्तर एकच असू शकते. सरकार जनतेप्रती उदार आहे किंवा नाही. याशिवाय दुसरे मत किंवा उत्तर असणे शक्य नाही. पण मित्रहोN एखादा विषय असा येतो की, आपली मती काम करीत नाही. सन 2014 मध्ये भाजपने ‘अच्छे दिन’ चा नारा देऊन शेतकरी, कामगार यांना उदरनिर्वाह भागेल एवढी पेन्शन. सबका साथ सबका विकासचे स्वप्न दाखवून
  सत्ता हस्तगत केली. साहजिकच लोकांच्या आशा, आकांक्षा वाढल्या. काँग्रेसचा भ्रष्टाचार काही विशिष्ट
 • जमातीचा अति अनुनय यामूळे त्याना सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले. नसता काँग्रेस पक्ष देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा त्यागी, सदाचारी नेत्यांचा पक्ष म्हणून जगभर मान्यता पावलेला पक्ष होता पण चुकीच्या
 • धोरणामुळे व कमजोर नेतृत्व व घराणेशाहीमुळे रसातळाला गेला.
 • सत्तांतरानंतर मोदी सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला. परंतू हिंदूबहूल देशात कांही हिंदूहित
 • भासविणारे राम मंदीर, काश्मीर मधील 370 कलमाची बरखास्ती सारखे निर्णय घेतल्याने ते सहानुभूतीस पात्र
 • ठरले. अशा परिस्थीतीत जर कोणी मोदी सरकारची योग्यता विचारली तर एकच उत्तर देता येत नाही. कारण
 • मोदी सरकारची अर्थनिती व इपीएस कामगार कल्याण धोरण अपयशी ठरले आहे. परंतू दुसरी बाजू म्हणजे
 • हिंदूहित व राष्ट्रीय सुरक्षा उत्तम आहे. दोन्ही महत्वाच्या बाजू पाहता मोदी सरकार वाईट व चांगले आहे अशी
 • दोन मतं तयार होतात. म्हणजेच मोदी सरकारचे योग्यतेवर मत नोंदविणारी व्यक्ती दुतोंडी होते. यालाच मृदंग
 • वाचा असे म्हणतात. मृदंग दोन्ही बाजूने वाजतो तसा माणूसही क्वचित प्रसंगी एकाच विषयावर एकाच वेळी
 • दोन भिन्न मते नोंदवितो. प्रत्येक व्यक्तीस आयुष्यात असा एकदा तरी बाका प्रसंग येतो.
 • मृदंग वाचा ही अशी अवस्था आहे ज्यात मजबुरी, क्वचित प्रसंगी नाईलाज व सर्रास, दुहेरी निष्ठा,
 • अप्रामाणिकपणा लपलेला आहे. सत्य घटनाक्रमावरुन अपवादाने प्रगट होणारी दुतोंडी भाषा किंवा वाणी आपण
 • समजू शकतो. परंतू कलियुगात दुतोंडी सर्पराज वाढले असून राजकारणात यांची खूपच चलती आहे. सत्तेच्या
 • समीकरणात मृदंग वाचाळ वीरांचा दबदबा वाढला असून लोकशाहीत कधी नव्हे ते या आयाराम गयारामाना
 • अच्छे दिन आले आहेत.
 • एकेकाळी एकवचनी,चारित्र्य संपन्न,खादिची गांधी टोपी व भारतीय पेहराव करणारे लोकप्रतिनिधी
 • लोकप्रिय होते. लाल बहादूर शास्त्री, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, शंकरराव नांदेडकर, अटलबिहारी
 • वाजपेयी या सारखे महान नेते तरुणाईत वंदनीय होते. पण काळ बदलला त्यासोबतच आदर्श मुल्य व मापदंड
 • बदलले आहेत. आजची स्थिती अशी आहे की, ‘करता पक्षांतर होई सत्तांतर घेता हाती बंडाचा झेंडा मिळेल
 • मानाचा टोपी गोंडा’ अशी नवीन विचारधारा जन्माला आली आहे. त्यामुळे जुने तत्वाचे राजकारण मोडीत
 • निघाले असून घोडे बाजाराचा सर्वत्र उदो उदो होताना दिसत आहे. राजकारण गतिशील झाले असून ते आता
 • कोठे जावून धडकेल ? हे सांगता येणे कठीण आहे.
 • प्रा. के. एन. अंबाड, लातूर
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close