Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

रामपूरी जि.प. प्रशाळेला , मूख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे,उपमूख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी दिली भेट

मानवत / अनिल चव्हाण

मानवत आज दिनांक 16/12/2020 रोजी प्रशाला, रामपुरी बु येथे परभणीचे नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे साहेब आणि उपमुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते प्रशालेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या प्रशाळेच्या आवारातील वडाच्या वृक्षाला नाविन्य पूर्ण आधाराची पाहणी केली.
त्या नंतर प्र शाळेतील लोक सहभागातून तयार करण्यात आलेल्या घनवनाला भेट देऊन त्यांनी या वेळी पाहणी केली. या वेळी परभणी जि.प.चे नूतन मूख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे , यांनी या वेळी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून वृक्ष लागवडी साठी उपयुक्त सूचना केल्या.
यावेळी प्रगतशील शेतकरी नाथा भाऊ, ग्राम विकास अधिकारी कृष्णा कानडे , शैक्षणिक क्रांती समितीचे सेवानिवृत्त शिक्षक जेष्ट नागरीक , अर्जुन नाईक , संतोष यादव, वृक्षवल्ली फाऊंडेशन चे संदीप यादव, तलवारे सर, गणेश नाईक, गोपाळ यादव सर, विलास यादव, विश्वनाथ राऊत रामपूरी ग्रामपंचायत कर्मचारी शरद सोरेकर, कारभारी गंधाले तसेच जिल्हा परिषद प्रशाळेचे मुख्याध्यापक निरंजन गिरी,रमेश कदम सर, सचिन पाटील सर, भुजंग गमे सर,श्रीमती भोयर मॅडम, शेख बबलू आदी सह वृक्षवल्ली फाऊंडेशनचे पदाधिकारी व रामपूरी येथील ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close