Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

धुळे येथे होणाऱ्या डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर

            अलिबाग दि.3 :- बा.ना.हायस्कूल आवास येथे दि.31 जानेवारी 2021 रोजी रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल जिल्हा अंजिक्यपद व निवड चाचणी स्पर्धा आवासचे सरपंच अभिजित राणे व रणजित राणे या दोघा बंधूच्या सहकार्याने पार पडली. या स्पर्धेतून सिंध्दखेड धुळे येथे दि.6 व 7 फेब्रुवारी 2021 रोजी होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याच्या संघाची निवड करण्यात आली असून

हेही वाचाBudget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त

ती पुढीलप्रमाणे- श्री.राजेश पाटील, (मॉडेल रांजणखार कर्णधार), निहाल म्हात्रे, (मॉडेल रांजणखार), सुधाकर पाटील, बहिरीदेव बहिरीचापाडा,विक्रम पाटील, वीर बहिरीदेव बहिरीचापाडा, रोहित पाटील, एवन माणकुळे, अब्दुल दवनाक, बोर्ली, कुणाल मुरुडकर, खालापूर, दयानंद पाटील, न्यू यंग पिंपळपाडा, विजय काटकर, सुधागड पाली, सारंग पाटील, नांदाईचा पाडा, रुपम म्हात्रे, वाघ्रण, रेवण पाटील, प्रशिक्षक राजंणखार, व्यवस्थापक अमित जगताप, खालापूर, हा संघ निवडण्यासाठी हिरामण भोईर, पिंपळपाड, मोहन धोत्रे, वाघ्रण, विनायक पाटील, रांजणखार यांनी काम पाहिले. निवडण्यात आलेल्या संघाचा सराव शिबीर राज्याचे सचिव दिपक मोकल, कोकण विभाग प्रमुख शरद कदम, उपाध्यक्ष सुनिल म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राजंणखार येथे संपन्न झाला.
हेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान

            याप्रसंगी सदस्य, अविनाश म्हात्रे, पंचप्रमुख प्रसन्न कुमार पाटील, बब्रुवाहन गायकवाड, यतीराज पाटील, हिरामण  भोईर व अन्य मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी स्पर्धा निरीक्षक म्हणून शरद कदम, खोपोली, पंच प्रमुखपदी रविंद्र म्हात्रे, खोपोली तसेच सिलेक्टर म्हणून सुनिल म्हात्रे व उपपंच प्रमुख म्हणून प्रसन्नकुमार पाटील यांची निवड झाली आहे.
हेही वाचा “अटल आनंदवन घन वन” प्रकल्प जणू देवस्थानाची निर्मितीच :प्रधान मुख्य वन संरक्षक श्री.जीत सिंग

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close