Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

रा.प. कामगारांना ५० लक्ष रुपयेचा विमा करावा ; मनसे ची मागणी

mh20live

औरंगाबाद  | कोरोना व्हायरस सारख्या महामारिने उपद्रव माजवीला असुन हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. अश्या गंभीर परिस्थितीत राज्य परिवहन कामगार जनतेस सेवा देत आहे व सेवा देत अस्तांना त्याचासुध्दा जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे त्यामुळे अशा गंभीर परिस्थितीशी लढण्यासाठी नियमानुसार प्रत्येक कामगाराचा ५० लक्ष रुपयेचा विमा तयार करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक, मुंबई यांना मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, कोरोनाच्या या संकटात कर्तवव्यास जातांना प्रत्येक कामगारास सुरक्षा किट मास्क, सेनीटायझर इत्यादी मिळालेच पाहिजे तसेच प्रत्येक कामगाराचा ५० लक्ष रुपयेचा विमा तयार करण्याची मागणी या निवेदनाद्वारे कण्यात आली आहे.  आजघडीला सर्वत्र खानावळी व हॉटेल बंद असल्यामुळे चालक वाहक याची जेवणाची व नाश्ताची व्यवस्था स्वतः महामंडळाने करावी, नियमानुसार ५० वर्षा आतील कामगारांनाच कर्तव्य देण्यात यावे, नियोजनपूर्वक रा.प. वाहने व कामगारांचा उपयोग करण्यात यावा कारण आज घडीला तोटा वाढत असून गेल्या दोन महिन्यांपासून राज्य परिवहन कामगार यांचे वेतन वेळेवर होत नाहीत त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे भविष्यात कामगारांना वेतन वेळेवर मिळेल याची दक्षता घेवुन त्या प्रमाणे पूर्वनियोजन करण्यात यावे. कामगार कामावर हजर राहू शकला नाही तर त्यास निलंबित करू नये अश्यासुचाना शासनाकडुन असुनही कामगारांना निलंबित करण्यात आले आहे जे बेकायदेशीर आहे. ( उदा. ठाणे, पालघर, औरंगाबाद) सदरची प्रकरणे त्वरीत थांबविण्यात यावीत. आज घडीला लॉक डाऊन मुळे  कामगार आपल्या मुळ गावी अडकला आहे किंवा काही कामगार रेड झोन मध्ये अडकले आहेत अश्या सर्व कामगारांना विशेष रजा देण्यात यावी.

राज्य परिवहन कामगार हा सुध्दा सामाजिक घटक असुन इतर सामाजास सुरक्षित व वक्तशीर सेवा देत आहे त्यामुळे वरील सर्व मुद्यांची अंमलबजावणी व्हावी ही नम्र विनंती. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, परिवहन कामगार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोक पवार पाटील, मराठवाडा सचिव संदीप जाधव, जिल्हा अध्यक्ष उमेश दिक्षित, परिवहन कामगार सेनेचे रवींद्र शिरसाट व कैलास पाटील यांनी केले आहे. याबाबत मा.  रा.प. औरंगाबाद चे विभाग नियंत्रक अरुण सिया यानाही निवेदन यांना देण्यात आले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close