Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

पं. दिनदयाल उपाध्याय विभागीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन दि.१ ते ७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत आयोजन

औरंगाबाद,दि.३०, महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, औरंगाबाद, या कार्यालयामार्फत दि.१ ते ७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आणि उपलब्ध असलेल्या रिक्तपदाच्या माहितीसाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे. तसेच ज्यांची नोंदणी नाही त्यांनी नोंदणी करुन अप्लाय करावे. या बाबत काही अडचण आल्यास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाच्या 0240-2334859 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा,असे उपआयुक्त अ.भि.पवार, व सहायक आयुक्त एन.एन.सूर्यवंशी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभाग औरंगाबाद यांनी कळविले आहे.
एस.एस.सी., एच.एस.सी., आय.टी.आय., पदवीधर, डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवीधर, एम.बी.ए, इत्यादी पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. तसेच रिक्त जागांबाबत दररोज माहिती अपडेट करण्यात येते, तरी उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघावी.
या मेळाव्यासाठी प्रामुख्याने जय बालाजी एन्टरप्रायजेस औरंगाबाद,अभिजय ऑटोपार्टस प्रा.लि. औरंगाबाद, आकार ऑटो इंडस्टीज लि औरंगाबाद,चौगुले इंडस्टीज प्रा.लि. पुणे, महावितरण कार्यालय औरंगाबाद,मुख्य जीवन विमा सल्लागार प्राधिकरण, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, सेक्युरिटी ॲण्ड इंटेलिजन्स सर्विसेस इंडीया लि. गोवा, रक्षा सेक्युरिटी फोर्स, हिंगोली, विराज प्रोफाईल लि. पालघर, श्री. गुरुकृपा इंजिनिअरिंग वर्क्स उस्मानाबाद, धूत टान्समिशन औरंगाबाद, महिंद्रा स्टील सर्व्हीस लि. पुणे, एनआरबी बेअरिंग औरंगाबाद,ॲसेंसीव्ह एज्युकेशन लि.पुणे व श्री साई रिसर्च लॅब , परम स्कील ट्रेनींग इंडीया प्रा.लि., औरंगाबाद, जे.के. मेटल इंजिनीअरींग वर्क्स, बीड,मॅक्स लाईफ इन्शुरन्स, औरंगाबाद, बी.डी.के. इलेक्ट्रोल्स, बीड, जी.एस.एल. फायनान्सियल सर्व्हीस,बीड, सेमिकॉन इंडिया,बीड, एसएमपी कॉर्पोरेशन, उस्मानाबाद, युनायटेड सेक्युरीटी फोरम, उद्गीर,‍ लातूर, लक्ष्मी अग्नी कॉम्पोनन्ट ॲण्ड फॉरजिन्स प्रा.लि. औरंगाबाद, फेवराटा इंडस्ट्रीज, औरंगाबाद, इण्डुरन्स टेक्नॉलॉजीस लि. औरंगाबाद इ. नामांकिंत उद्योजकांनी 2451 ऑनलाईन रिक्तपदे अधिसुचित केलेली आहेत.
तरी मेळाव्यात सहभागी व्हावे,असे आवाहन अ.भि.पवार, उपआयुक्त व एन.एन.सूर्यवंशी, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभाग औरंगाबाद यांनी केलेले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close