Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

आंदोलनकर्त्या शिक्षकांना अटक केल्यासंदर्भात विनाअनुदानित शिक्षकांचे निषेध व प्रचलित नियमाने 100% अनुदान मागणीचे तहसीलदारांना निवेदन


नायगाव/mh20live Network

29 जानेवारी विनाअनुदानित शाळांना पासून प्रचलीत नियमानुसार 100% अनुदान मिळावे या मागणीसाठी आंदोलन कर्त्या शिक्षकांवर दबाव तंत्राचा वापर करत त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ नायगाव येथे विनाअनुदानित शिक्षकांच्या वतीने शासनाचा निषेध करीत 100% अनुदान मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
गेल्या 20 वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या या विना अनुदानित शिक्षकांचे आंदोलन शिक्षक समन्वय संघ, कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदान येथे चालू आहे. यात अर्धनग्न आंदोलन, मुंडण आंदोलन, आत्मदहन ईशारा, सामूहिक हत्या निवेदन ही या शिक्षकांच्या वतीने शासनास देण्यात आली आता पर्यंत 200 च्या जवळ या शिक्षकांनी आपल्या वेतनासाठी आंदोलने केली आहेत. अनेक शिक्षक विनावेतन रिटायर झालीत अनेकांनी आपली जिवन यात्रा संपवली यातील बरीच शिक्षक पवित्र ज्ञानदानाचे कार्य करीत रोजंदारी मोल मजुरी ही प्रपंचासाठी करतात. यामुळे या शिक्षकांत शासनाविरोधात तीव्र असंतोष आहे.

संबंधित बातम्या :भोकरदन :वादळी पाऊस सह गारपिटी मुळे कांदा पीक व गावाचा मोठे नुकसान

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाची नाहक होणारी बदनामी थांबवावी यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

काँग्रेस शासनाच्या काळात कायम विनाअनुदान ठपका 2009 साली आघाडी शासनाच्या काळात उठवण्यात आल्या नंतर याना टप्याटप्याने अनुदानावर अन्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला यात अंत्यत जाचक अटी घालण्यात आल्या आशा स्थितीत ही अनेक शाळा आज रोजी अनुदानास शासनाकडून या अग्निदिव्याचे निकष पार करून पात्र ही झाल्या पण भाजप सरकारच्या काळात सरसकट अनुदानाची खुंटी मारून यांना पुढील वाढीव टप्यासाठी खीळ बसवण्यात आली. यामुळे अजतायगत या शाळांना नियमांप्रमाणे वेतन मिळत नाही त्यासाठी वेळोवळी हे विनाअनुदानित शिक्षक आंदोलन मोर्चे काढूनही शासनदरबारी दाद घेतली जात नसल्याने या शिक्षकांनी अनेक वेळा आयुष्यतील फरफट व नैराश्यतून मुख्यमंत्री यांना निवेदने देऊन इच्छा मरणाच्या ही परवानगी मागितल्या आहेत. असे असताना त्यांच्या आंदोलनाची दाद न घेता आंदोलनकर्त्या शिक्षकांना अटक केल्याने या शिक्षकांत शासन विरोधात तिव्र नाराजी पसरली असून या घटनेचा निषेध व्यक्त करीत या विनाअनुदानित शिक्षकांनी नायगाव येथिल तहसीलदार यांना निवेदन देउन सदर घटनेचा निषेध करून प्रचलित नियमानुसार100% अनुदान मागणीचे व चालू असलेल्या मुबंई येथील आंदोलनास पाठिंबा दर्शवणारे निवेदन दिले. यावेळी प्राचार्य ताटे एम. बी., प्राचार्य ई.एस. कल्याण सर, एस.ए. भालेराव, पिंपळदरे सर, प्रा.हंबर्डे सर, प्रा. नकाते सर, प्रा.मोरे सर,प्रा. सौ. एम.व्ही. बाबरे, प्रा. बैस सर, प्रा. वसमते, प्राचार्य सौ. अनिता गोपछडे, प्रा. येवते, प्रा. अखिल सर, प्रा. मोहिते सर, प्रा. बोंडले, शिंपाळे सर, भालेराव सर, एन. आर. कल्याण सर आदींसह अनेकांची उपस्थिती होती

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close