Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेसशेतीविषयक

पाचोडच्या आठवडी बाजारात भाज्याचे दर घसरले

पाचोड /शिवनाथ हजारे

येथील आठवडी बाजारामध्ये पालेभाज्यांची आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे तर ग्राहकांना मात्र लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच पालेभाज्या स्वस्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा जोरदार व अतिवृष्टी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील जवळपास सगळेच पीके पूर्णपणे हातातून गेली असली तरी ही हा पाऊस समाधान कारक झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे डिसेंबर महिन्यातही विहीर बोरवेल तळे ओढे-नाले भरलेली आहेत यामुळे या पावसाचा मोठा फायदा जलस्त्रोत मध्ये झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके गेल्याने शेतकऱ्यांनी ती पिके काढून त्या ठिकाणी रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा आदीसह भाजीपाल्याची पिके घेतली आहेत यामुळे साप्ताहिक आठवडी बाजारात सातत्याने पालेभाज्या पिकांची आवक वाढत आहे. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे. दरम्यान, आवक वाढल्याने भाव पडले असले पालेभाज्यांना उठाव नसल्यामुळे कोथिंबीर मेथी सारख्या भाज्या फेकून देण्याची वेळ आली आहे किरकोळ बाजारात मेथी, पालक, कोथिंबीर आदीं ५ ते १० रुपये जुडी प्रमाणे विकली जात होती आता दहा रुपयाच्या चार जूडी याप्रमाणे विक्री होत आहे. बटाटे १० ते २० रुपये किलो, कांदे ३० ते ४० रुपये किलो, सर्व फळभाज्या २० ते ३० रुपये किलो या किमान दराने विकल्या जात आहे. सध्या भेंडी, वांगी, गवार, गिलके दोडका शिमला मिरची
टमाटे, बटाटे, काकडी, गाजर, दुधी, पालक, मेथी, आदींची आवक जास्त आहे. यामुळे या भाज्यांचे दर उतरले असल्याने पालेभाज्या उत्पादक व्यवसाय संकटात सापडला असून शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तर लॉकडाऊन नंतर पालेभाज्या प्रथमच स्वस्त झाल्याने हा मोठा दिलासा ग्राहकांना मिळाल्याचे चित्र आठवडी बाजारात पाहायला मिळत आहे.
ह्यावर्षी आतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील संपुर्ण पिक वाया गेली.त्यामुळे त्या ठिकाणी ते पिक काढून मोठया आशेने पाले भाज्याची लागवड केली परंतु भाज्याची आवक वाढल्याने दर घसरल्याने शेतकरी दुसऱ्या संकटात सापडला आहे.
गयाबाई गहाळ -दादेगाव हजारे शेतकरी
महिला पालेभाज्या विक्रेत्या.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close