Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

नागरी सेवा पूर्व परिक्षा 4 ऑक्टोंबर रोजी

नागरी सेवा पूर्व परिक्षा 4 ऑक्टोंबर रोजी

औरंगाबाद,दि. 24 – संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली मार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवार दि. 4 ऑक्टोंबर 2020 रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत तर दुसरे सत्र दु. 14.30 ते 16.30 या कालावधीत घेणार असुन ही परीक्षा औरंगाबाद शहरातील 32 उपकेंद्रावर होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

या परिक्षेसाठी 11429 उमेदवारांना प्रवेशपत्रे पाठविण्यात आली आहे. या परीक्षेच्या कामासाठी 1623 अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांने आयोगाने दिलेले प्रवेश प्रमाणपत्र तसेच पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स यापैकी किमान कोणतेही दोन ओळखपत्र व त्यांची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

        परीक्षा कक्षामध्ये पहिल्या सत्रासाठी सकाळी 9.20 वाजेनंतर  तर दुसऱ्या सत्रासाठी 14.30 वाजेनंतर उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, मास्क सॅनिटायझर बॉटल, पिण्याचे पाण्याची बॉटल , मनगटी काटयाची घडयाळ ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमदेवारास परवानगी असणार नाही.

        उमेदवाराने त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्ल्युटुथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षामध्ये घेवून जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परिक्षांकरीता बंदी घालण्यात येईल. परिक्षा केंद्राच्या प्रवेशदारावरच परीक्षेच्या दिवशी उमेदवाराची तपासणी पोलीसामार्फत करण्यात येणार आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता संघ लोकसेवा आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार असून परिक्षेचे जिल्हा समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close