Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

“प्रधानमंत्री मुद्रा योजना जिल्हास्तरीय समन्वय समिती अन् कार्यपध्दती”

“प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)” चा लाभ जास्तीत जास्त तरुणांना मिळावा, यासाठी या केंद्र शासनाच्या योजनेबाबत प्रचार प्रसार व समन्वय करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीचे गठन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने कार्यान्वित केलेल्या वित्तीय समावेशन उपक्रमामधील तसेच केंद्र व राज्य शासनाचे इतर बँकिंग निगडित योजनांचे राज्यातील ग्रामीण तसेच दूर्गम भागात जनसामान्यांना माहिती होण्यासाठी आणि या सर्व लोक कल्याणकारी योजनांचा लाभ गरजू आणि होतकरू व्यक्तींना जास्तीत जास्त व्हावा, या हेतूने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रभावीपणे प्रचार, प्रसार आणि समन्वय केला जातो.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “प्रधानमंत्री मुद्रा योजना जिल्हास्तरीय समन्वय समिती” बाबत शासनाने नियोजन विभागामार्फत सुधारित निर्णय घेतला असून “केंद्र व राज्य शासनाच्या बँकिंगशी निगडित योजनांची प्रचार, प्रसिद्धी व समन्वय” या योजनेकरिता खालीलप्रमाणे “जिल्हास्तरीय समिती” पुनर्गठित करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या बँकिंगशी निगडित योजनांची प्रचार, प्रसिद्धी व समन्वयाकरिता जिल्हास्तरीय समिती :-

जिल्हाधिकारी- अध्यक्ष,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद- उपाध्यक्ष
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा- सदस्य
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी- सदस्य,
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी- सदस्य
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था- सदस्य
महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र- सदस्य
सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता- सदस्य
जिल्हा माहिती अधिकारी- सदस्य
जिल्हा व्यवस्थापक, राज्य शासनाचे मागासवर्ग विकास महामंडळ (सर्व)- निमंत्रित
सहाय्यक महाप्रबंधक, नाबार्ड- सदस्य
जिल्हा अग्रणी बँक अधिकारी- सदस्य,
जिल्ह्यातील प्रमुख बँकांचे समन्वयक अधिकारी- निमंत्रित
जिल्हा नियोजन अधिकारी – सदस्य सचिव.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पुनर्गठित “केंद्र व राज्य शासनाच्या बँकिंगशी निगडित योजनांची प्रचार प्रसिद्धी व समन्वय” या योजनेंतर्गत उपलब्ध निधीच्या मर्यादेत “केंद्र व राज्य शासनाच्या बैंकिंग निगडित योजनांची प्रचार प्रसिध्दी व समन्वय” या योजनेंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून निर्गमित शासन निर्णय / परिपत्रकाप्रमाणे प्रचार व प्रसिद्धीची कामे हाती घेता येतील. यासाठी जिल्हास्तरीय समितीस जनगणना 2011 वर आधारीत जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पुनर्गठित “केंद्र व राज्य शासनाच्या बँकिंगशी निगडित योजनांची प्रचार प्रसिद्धी व समन्वय” या योजनेकरिता “जिल्हास्तरीय प्रसिध्दी व समन्वय समिती” कडून खालील उपाययोजना राबविण्याबाबत निर्णय घेता येईल:-

बँकिंग निगडित योजनांमध्ये ग्रामीण व दुर्गम भागातील लाभार्थ्यांचा सहभाग वाढविण्याकरिता लाभार्थी व बैंक प्रतिनिधी यांचे संयुक्त मेळावे आयोजित करणे तसेच जनजागृतीकरिता विशेष मोहिमेची रूपरेषा निश्चित करणे.
बँकांच्या “व्यवसाय सहाय्यक” मार्फत आदिवासी व दुर्गम भागामध्ये “वित्तीय समावेशन” वाढ होण्याकरिता कार्यशाळा व चर्चासत्र आयोजित करणे व जनजागृतीकरिता विशेष मोहिमेची रूपरेषा निश्चित करणे.
बँकाकडून कर्ज घेऊन “सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग” क्षेत्रातील यशोकथांची निवड करून शासकीय संकेतस्थळ व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सोय उपलब्ध करणे.
बँकिंग निगडित योजनांच्या वैशिष्टय संदर्भात माहिती वजा लेख प्रसिध्द करणे तसेच एफ.एम. चॅनेल व स्थानिक चित्रगृहामध्ये जिंगल्स द्वारे प्रसिद्धी करणे.
बँकिंग निगडित योजनांचा चित्ररथ, लोकनाट्य, लोककला इत्यादी माध्यमातून जनजागृतीकरिता विशेष मोहिमेची रूपरेषा निश्चित करणे.
बँकिंग निगडित योजनामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, तसेच महिला व दिव्यांग लाभार्थी या विशेष घटकातील लाभार्थीचे सहभाग वाढविण्याकरिता विशेष मोहिमेची रूपरेषा निश्चित करणे.
बँकाकडून “खरीप व रब्बी” हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होण्याकरीता शेतकऱ्यांचे मेळावे आयोजित करून प्रचार व प्रसिद्धी करीता विशेष मोहिमेची रूपरेषा निश्चित करणे.
बँकाकडून महिला बचतगट व बँक लिंकेज मध्ये वाढ व शेतकरी उत्पादक गट (Farmers Producer Group) यांना अधिक कर्ज उपलब्ध होण्याकरीता प्रचार व प्रसिद्धीची विशेष मोहिमेची रूपरेषा निश्चित करणे.

जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीच्या बैठकीच्या दिवशी परंतु प्रत्येक तिमाहीतून किमान एकदा घेण्यात यावी, असेही या शासन निर्णयाद्वारे सूचित करण्यात आले आहे.

या शासन निर्णयातील उपाययोजनांप्रमाणे कार्यवाही केल्यास “प्रधानमंत्री मुद्रा” योजनेची अधिकाधिक प्रसिध्दी होवून त्याचा लाभ जास्तीत जास्त गरजू तरुणांना निश्चित होईल.
मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close