Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

पेणच्या बालिका अत्याचार प्रकरणी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार -पालकमंत्री कु.आदिती तटकरे

पीडित बालिकेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेमधून तात्काळ मदत करण्याचे प्रांताधिकार्‍यांना दिले आदेश

अलिबाग,जि.रायगड दि.30:- पेण येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आराेपीविरोधातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार असल्याची माहिती पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पेण येथे दिली.
आज दुपारी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला, त्यावेळी त्या बाेलत हाेत्या. यावेळी पोलीस महानिरीक्षक संजय माेहिते, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव उपस्थित हाेते.
यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे गरजेचे असून हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासंबधी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते व रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना दिल्या. तर पीडितेच्या कुटुंबियांना या घटनेतून सावरण्यासाठी समुपदेशन होणे गरजेचे आहे, शासनाच्या मनोधैर्य योजनेतून पीडित बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याचे आदेशही त्यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना दिले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close