Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 19 व 20 ऑगस्ट रोजी ऑनलाईन

औरंगाबाद :  औरंगाबादच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 19 व 20 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एन.एन.सूर्यवंशी यांनी केले आहे.

औरंगाबाद जिल्हयातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामधील मुलाखती  व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे (Skype, Whatsapp etc.) घेण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांपासून अनेक औद्योगिक आस्थापना, व्यवसाय व उद्योग बंद होते. आता शासनाने काही अटी व शर्तीच्या अधीन राहुन कंपन्या औद्योगिक आस्थापना व्यवसाय उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत असल्याने नियोक्ते आणि रोजगार इच्छुक उमेदवारांकरिता हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी शैक्षणिक पात्रतेप्रमाणे  ऑनलाईन अर्ज सादर करावा.  अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्स (Skype, Whatsapp etc.) द्वारे घेण्यात येणार आहेत. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी वेबपोर्टलवर लॉग इन करावे. नोकरीइच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळवर किंवा अँड्रॉईड मोबाईल धारकांनी प्लेस्टोअरमधून Mahaswayam ॲप मोफत डाऊनलोड करुन नोंदणी करावी. तसेच लॉगइन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज सादर करावा.

                   भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.rojgar.mahaswayam. gov.in या वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhyay Job Fair ऑप्शन वर Click  करुन Aurangabad Online Job Fair -2 (2020-21) यावर त्यांचेकडील रिक्तपदे अधिसूचित करावी. तसेच मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिध्दी  या विभागाच्या वेबपोर्टलवर विनामुल्य करावी.  याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 0240-2334859 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही त्यांनी कळवले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close