Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

भारत-पाक सीमेवर उस्मानाबादचा तरुण ताब्यात, प्रेयसीच्या भेटीसाठी पाकिस्तानला


हा मुलगा उस्मानाबादचा असल्याची माहिती, रात्री पाकिस्तानी सीमेवर पकडले

ताज्या बातम्या साठी subscribers-करा,MH20LiVE बघत राहा www.mh20live.com

उस्मानाबाद : सीमासुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाक सीमेवरुन एका 20 वर्षीच्या मुलाला पकडले आहे. हा मुलगा उस्मानाबादचा असल्याची माहिती आहे. झिशान सिध्दिकी असे या तरुणाचे नाव आहे. तो सीमेवर आपल्या पाकिस्तानी प्रेयसीला भेटायला गेला होता. त्याला रात्री पाकिस्तानी सीमेवर 9.30 वाजता पोलिसांनी पकडले. विशेष म्हणजे तो आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकीवरून निघाला होता. देशभरात कोरोनामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
माहितीनुसार, झिशान हा उस्मानाबादहून अहमदनगरपर्यंत सायकलवर पोहोचला. अहमदनगर ते गुजरात दुचाकीवर पोहोचला आणि मग पायी चालत सीमेच्या जवळ पोहोचला. त्याची दुचाकी वाळूमध्ये अडकल्यानंतर तो पायी चालत पाकिस्तानला जाणार होता. सुरक्षादलाला वाळूत अडकलेली एक दुचाकी सापडल्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली. यानंतर त्यांनी झिशानला ताब्यात घेतले. त्यावेळी तो महाराष्ट्रातील असल्याचे स्पष्ट झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील कथित प्रेयसीला भेटण्यासाठी सीमारेषा ओलांडून पाकिस्तानकडे जाण्याची झिशानची इच्छा होती. कथित प्रेयसीला भेटायला बीएसएफने पाकिस्तान आणि कच्छ सीमेपलीकडे फिरत असलेल्या युवकाला पकडले.
उस्मानाबाद पोलिसांची एक तुकडी या मुलाला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाली आहे. मुलाच्या दाव्यात किती तथ्य आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.
या मुलाचे वडील मौलाना आहेत. तो इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. जाताना हा उस्मानाबाद ते अहमदनगर जिल्ह्यातील पर्यंत सायकलवर गेला. तिथून त्याने दुचाकी घेतली. याची माहिती कळाल्यावर एटीएस, सायबर, औरंगाबाद, उस्मानाबाद, मुंबई पथके कार्यान्वित झाले. उस्मानाबाद, औरंगाबाद आणि मुंबई एटीएसने शोध घेतला. त्याचा लॅपटॉप तपासला गेला. तो पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात आहे, हे लक्षात आल्यावर सीमेवर कळवले होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close