Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

जागतिक मृदा दिनानिमित्त माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आँनलाईन मार्गदर्शन

रिलायन्स फाऊंडेशनचा व मराठवाडा कुषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कुषी विज्ञान मंडळ गेवराईचा उपक्रम

माजलगाव / रविकांत उघडे

दरवर्षी दि ०५ डिसेंबर हा दिवस जागतिक पातळीवर माती दिवस म्हणून साजरा केला जातो या वर्षी जमीन जिवंत ठेवा जैवविविधतेचे रक्षण करा हे ब्रीवाक्य घेऊन शेतकऱ्यांना जमिनीचा पोत सुधारणीसाठी रिलायंस फाऊंडेशन व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगांव ता.गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वॉट्स आप चाट द्वारे मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात,माली पारगाव,किठी आडगाव,शहापूर मजारा,सावरगाव,वाघोरा तसेच हरकी लिमगाव या सात गावतील सुमारे ४० शेतकरी सहभागी झाले होते या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.हनुमान गरुड विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र खामगांव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी मार्गदर्शन करताना सागितले की जमिनीचा पोत सुधरण्यासाठी शेंद्रीय शेती कडे जास्त भर दिला पाहिजे ज्या शेतकऱ्यांना शेंद्रीय शेती शक्य नाही अश्या शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून आपल्या जमिनीला ज्या घटकाची अवक्षकता आहे तितक्याच प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला पाहिजे तणनाशक , कीटनाशकांचा बेसुमार वापर टाळला पाहिजे जमिनितल शेन्द्रिय कर्ब हा जमिनीतील सुपिकतेचा खरा आधार आहे तो टिकवणे अतेंत गरजेचे आहे जागतिक मृदा दिनानिमित्त माती परीक्षानविषयी जागरूक राहून त्यावर आधारित जमीन आरोग्य पत्रिकेचा वापर करून जमिनीची निगा राखूया असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या प्रश्नांचे निराकरण करून घेतले या कार्यक्रमाचे आयोजन रिलायंस फाऊंडेशन चे जिल्हा व्यवस्थापक मनोज काळे व कार्यक्रम सहायक विजय खंडागळे यांनी केले होते

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close