Subscribe to our Newsletter
Loading
सामाजीक/विचार/सुविचार

जागतिक अपंग दिना निमित्त दिव्यांग बांधवाचा वधु-वर परिचय मेळावा, रोजगार मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन


नायगाव ता./ शेषेराव कंधारे

प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नांदेड जिल्ह्याच्या वतीने जागतिक अपंग दिनाचे अवचित्य साधून दि.20 डिसेंबर रोजी अंबीका मंगल कार्यालय नायगाव बाजार येथे सकाळी ११ वाजता दिव्यांग बांधवाचा वधु-वर परिचय मेळावा, रोजगार मेळावा तसेच रक्त दान शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे नायगाव तालुकाध्यक्ष साईनाथ बोईनवाड यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाचे उद्दघाटक म्हणून शिक्षण व बांधकाम सभापती संजय माधवराव अप्पा बेळगे हे आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.आ.वसंतराव चव्हाण हे आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज पा होटाळकर ,माणिकराव लोहगावे,प्राचार्य संजय पाटील शेळगावकर, विठ्ठलराव देशमुख, विजय पा.चव्हाण, डाॅ. प्रसाद बोराळकर,शरद भालेराव, गणेश पा हांडे, गोविंद रोडे, प्रितपालसिंह महाराज,विठ्ठलराव मंगणाळे,पंढरीनाथ हुंडेकर यासह आदींची उपस्थिती राहाणार आहे.
या रोजगार मेळावास मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा उधोग केंद्र नांदेडचे व्यस्थापक व दिव्यांग विक्त विकास महामंडळ नांदेड येथील प्रमुख अधिकारी तसेच एम आय डि सीचे प्रमुख येणार आहेत.तरी सर्व दिव्यांग बांधवानी उपस्थित राहुन अविवाहीत दिव्यांग बांधवानी आपल्या नावाची नोंद करण्यात यावी व महारक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन इतरांना जीवदान देण्यासाठी मदत करावी अशी विनती प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नांदेड जिल्हा व नायगाव तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close