Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

रावसाहेब दानवे यांच्या प्रश्नावर चक्क भाजप नेत्यानं जोडले हात, केला ‘हा’ गौप्यस्फोट

जालना,: शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं वादग्रस्त वक्तव्य करून केंद्रीय राज्यमंत्री तथा जालन्याचे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी रान पेटवून दिलं आहे.

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. मात्र, आता चक्क भाजप नेत्यानं दानवेंच्या प्रश्नावर पत्रकारांसमोर हात जोडले.देशभर शेतकर्‍यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीनमधून मदत मिळत असल्याचं म्हटलं होतं. दानवेंनी शेतकऱ्यांचा अपमान केल्यानं त्यांच्या टोकेची झोड उठली आहे. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याबद्दल भाजपचे राज्यसभा खासदार भागवत कराड यांना ‘News 18 लोकमत’ने प्रश्न केला होता. मात्र, या विषयावर मी काहीही न बोललेलंच बरं, असं म्हणत खासदार भागवत कराड यांनी थेट आपले दोन्ही हात जोडले. शेतकरी कायद्यासंदर्भात सरकारची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेनिमित्त खासदार कराड जालन्यात आले होते.

भागवत कराड यांचा गौप्यस्फोट

केंद्र सरकार कृषी कायद्याबाबत आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहे. मात्र आंदोलक हे कायदे रद्द करण्याच्या मागणीवर कायम असून त्यांची भूमिका अडेलटट्टूपणाची आहे. लोकशाही असल्याने शेतकऱ्यांचं हित या कायद्यात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे कायदे रद्द होणार नाही, असं भाजपचे राज्यसभेतील खासदार भागवत कराड यांनी सांगितलं. ते जालन्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. कृषी कायदयाची जनजागृती करण्यासाठी सोमवारी जालन्यात भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कराड यांनी हा आरोप केला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close