Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

१००,१०, ५ रुपयाच्या जुन्या नोटा बंद होणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रुपयांच्या नोटांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारी

मुंबई, दि.२३ : मार्च किंवा एप्रिलमध्ये १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा विचार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रुपयांच्या नोटांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारी आहेत. १०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून काढण्याचा आरबीआयचा विचार आहे. जिल्हा स्तरीय बैठकीत आरबीआयनं ही माहिती दिली आहे. लोकांनी घाबरू नका असे त्यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर बी महेश यांनी सांगितलं, मार्च किंवा एप्रिलमध्ये १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा विचार आहे. जिल्हा स्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समिती यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिल आहे.
बँकेत जमा झालेल्या १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा पुन्हा चलनात येणार नाही यासाठी बँकांनी तयारी केली आहे.यावेळी बी महेश यांनी १० रुपयांच्या नाण्याला अद्यापही व्यापारी तसंच उद्योजकांकडून स्वीकारलं गेलं नसल्यावरुन नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “१० रुपयांचं नाणं आणून १५ वर्ष झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वीकार न करणं बँका आणि आरबीआयसाठी मोठी समस्या झाली आहे. १० रुपयांची नाणी बँकांसाठी मोठं ओझं झालं आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. ibn लोकमत व लोकसत्ता यांनी वृत्त प्रकाशित केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close