Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

लता दीदी, सचिन तेंडुलकर यांची नव्हे, तर भाजपच्या आयटी सेलची चौकशी करणार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

नागपूर : लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना पूर्ण देश दैवत मानतो. मी त्यांच्या चौकशीची भाषा कधीच केलेली नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मला भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, असे म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण गृहमंञी अनिल देशमुख यांनी दिले आहे.
केंद्राच्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलनासंदर्भात काही परदेशी सेलिब्रिटींनी टि्वट केले होते. या टि्वटला सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी विरोध केला होता. हा आमच्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे, असे या सेलिब्रिटींनी परदेशी कलाकारांना झापले होते. मात्र, सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांना ७० दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु असताना याविषयी बोलावेसे वाटले नाही का, असा आक्षेप घेत नेटकऱ्यांनी भारतीय सेलिब्रिटींवर टीकेची झोड उठवली होती. यानंतर अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करणार आहे, असे संकेत दिले होते. त्यामुळे राज्य सरकार लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्याविरुद्ध कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
याच पार्श्वभूमीवर आज सोमवारी अनिल देशमुख यांनी आपली बाजू मांडली आहे. सेलिब्रिटींच्या ट्विटबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यासकेला गेला आहे. मी म्हणालो, भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, पण माझ्या तोंडीन लता मंगेशकर, तेंडुलकर यांची चौकशी करणार,असे वाक्य घालण्यात आले, असे देशमुख यांनी स्पष्ट सांगितले आहे.
देशमुख म्हणाले की, माझा आदेश हा भाजपच्या आयटी सेलची चौकशी करण्यात यावी, असा होता. त्यांनी काही स्क्रिप्ट दिली का? दिल्लीमध्ये आम्ही जी चौकशी केली, त्यामध्ये भाजप आयटी सेलचे प्रमुख आणि 12 इन्फ्ल्युएन्सरची नावे समोर आली आहेत. त्यांची चौकशी रितसर सुरु आहे, असे अनिल देशमुख म्हणाले आहे.

संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी होईल : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी केलेले आरोप चुकीचे आहे. वन मंत्री संजय कराठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
देशमुख पुढे म्हणाले की, पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल, असे देशमुख यांनी सांगितले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close