Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

पुणे पदवीधर’ निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी; भाजपला धक्का

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघावर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत अरुण लाड यांना तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली आहेत, तर भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली आहेत. लाड यांनी या निवडणुकीत 48 हजार 824 मतांची आघाडी मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. लाड यांनी 1 लाख 14 हजार 137 मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला आहे.

दरम्यान, अंतिम निकाल येण्यापूर्वीच लाड यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी सुरु केली होती. दुसऱ्या फेरीतील मतमोजणीनंतर लाड यांचा विजय निश्चित मानला जात होता. आता अंतिम निकाल समोर आले आहेत. अरुण लाड यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात तिरंगी लढत होईल असे म्हटले जात होते. परंतु अरुण लाड मतमोजणी सुरु झाल्यापासून आघाडीवर होते. या निकालांवरुन स्पष्ट झाले आहे की, ही निवडणूक एकतर्फी झाली आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी झाल्याने राष्ट्रवादीच्या पाटलांनी भाजपच्या पाटलांना पराभूत केले, असे म्हटले जात आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close