Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

एसटी कॉलनीत नवरात्रउत्सव साधेपणाने ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महारुद्र हनुमान मंदिर समितीचा निर्णय

औरंगाबाद | mh20live Network

एसटी कॉलनीतील श्री महारुद्र हनुमान मंदिर येथे जय तुळजाभवानी नवरात्र उत्सव समितीच्या वतीने यंदाचा नवरात्र उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येत असल्याची माहिती श्री महारुद्र हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष अशोक पवार पाटील यांनी दिली.
दरवर्षी एसटी कॉलनी येथे दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मात्र यावर्षी जगभरात कोरोनाचे संकट असल्याने यंदाचा नवरात्र उत्सव जय तुजभवानी उत्सव समितीच्या वतीने शासनाच्या आदेशाने साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. नवरात्र उत्सव काळात सोशल डीस्टन्सिंग पालन करून दररोज विधिवत पूजा व आरती करण्यात येते. महिला मंडळाच्या वतीने भजन तसेच इतर उपक्रम राबविण्यात येत आहे. हा नवरात्र उत्सव साधेपणाने आणि शासनाच्या नियमांचे पालन करून साजरा करण्यासाठी जय तुळजाभवानी समितीच्या मंगला मलभागे, इंदिरा जगताप, चमन रसाळ, आशा जाधव, मेघा खानविलकर, सुनिता आगलावे, सुदामती डांबे, स्नेहलता दंडगव्हाळ, सोनल दंडगव्हाळ, सुशीला राजगुरू, संगीता खंडगावकर, श्रीकांता कवडे, अश्विनी पवार, भाग्यश्री मलभागे,नीता शिंदे, रश्मी हरणे, सुलभा खोचे, रश्मी हरणे, स्वरा दंडगव्हाळ, या पुढाकार घेत आहेत. या नवरात्रोत्सवासाठी श्री महारुद्र हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष अशोक पवार पाटील, एसटी हौसिंग सोसायटी चे अध्यक्ष देवनाथ जाधव, अशोक नवपुते, माणिकराव निकम, राजकुमार बनसोड, अशोक जगताप, नित्यानंद शिंदे, रवींद्र देशपांडे, विठ्ठलराव आगलावे, प्रमोद महेंद्रकर, काकासाहेब पवार, मनोहर कळसे, संदीप पगारे, संजय खानविलकर, संतोष डांबे, मनोहर कळसे, शरदचंद्र पाटील, अशोक आंबुलगेकर, रमाकांत निकम, शिवकुमार गजमल, सुनील खोचे, संतोष गाडेकर हे मार्गदर्शन करीत आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close