Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

नवनीत एज्युकेशन लिमिटेड सादर करीत आहे नवनीत डिजिबुक

mh20live Network

मुंबई: नवनीत एज्युकेशन लिमिटेड या शैक्षणिक साहित्य निर्मिती करणाऱ्या भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि लोकप्रिय ब्रॅंडने ‘नवनीत डिजिबुक’ची निर्मिती करून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुलभ व अधिक सुकर करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. नवनीतने प्रकाशित केलेल्या सर्व पुस्तकांची स्मार्ट आणि डिजिटल आवृत्ती डिजिबुक अॅप त्याचप्रमाणे वेब-आधारित प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.
हेही वाचाBudget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त

ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्यात नवनीत ब्रॅंड काळाच्या कायम दोन पावले पुढे राहिला आहे. नवनीतच्या याच सातत्यपूर्ण प्रयत्नांतील एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक सोपा आणि रंजक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उचित उपयोग करणे होय. अॅप आणि वेबसाइटच्या परस्परसंवादी स्वरूपामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना आणि अभ्यासक्रम अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या स्क्रीनवर पुस्तके पाहता येतील; त्याचबरोबर चित्रे झूम करून पाहणे, नोंदी (स्टिकी नोट्स) जोडणे, ड्रॉइंग टूल्सचा वापर करून मजकुरावर खुणा करणे आणि मित्रमैत्रिणींना डेटा पाठवणे यांसारख्या अनेक सुविधांचाही लाभ घेता येईल. परस्परसंवादी अभ्यास, अॅनिमेशन, मजकूर हायलाईट करणे व जोडणे आणि मोठ्याने वाचन करणे यांसारख्या खास वैशिष्ट्यांमुळे अभ्यास रंजक होईल आणि आपल्या सोयीनुसार पुस्तकांतील विविध पर्यायांतून हवी ती माहिती निवडणे शक्य होईल.
हेही वाचा साष्टपिंपळगावातील :मराठा उपोषण स्थगित केंद्राय आरक्षणा साठी :मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार

सर्वप्रथम नवनीतचा सर्वात लोकप्रिय ‘21 अपेक्षित प्रश्नसंच (21 MLQ)’ डिजिबुकच्या अॅप / वेबसाइटवर लॉन्च करण्यात आला. परंतु आता गाइड्स, राइझ सिरिज (सीबीएसइ),प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक वर्गाची पुस्तकेसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. लॉन्च ऑफर म्हणून, 21 अपेक्षितची छापील पुस्तके खरेदी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षासाठी नवनीत डिजिबुक विनामूल्य देण्यात येणार आहे. पुस्तकावर छापलेल्या अ‍ॅक्सेस कोडच्या साहाय्याने विद्यार्थी या डिजिबुकचा वापर करू शकतात.
हेही वाचा कोरोना लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

नवनीत डिजिबुकच्या प्रकाशनाविषयी माहिती देताना नवनीत एज्युकेशनचे ब्रँडिंग प्रमुख देविश गाला म्हणाले, “शिक्षणाच्या पारंपरिक पद्धती बदलताना भविष्यातील शैक्षणिक साधने आणि शिक्षणाची पद्धत या दोन्हींच्या स्वरूपात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची एजुटेक / एजटॅककडे क्षमता आहे; त्याचबरोबर पारंपरिक शिक्षणपद्धतींचे मूलभूत फायदे विचारात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. डिजिटल माध्यम व छापील पुस्तके या दोहोंचा सुयोग्य संगम झाल्यास विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढेल आणि त्यांना अभ्यासाचा आनंदही मिळवता येईल. डिजिटल माध्यमातून अभ्यास करणे जसे सुलभ व अधिक मनोरंजक होईल, तसे छापील पुस्तकांची वेळोवेळी मिळणारी साथ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल असे विद्यार्थी-स्नेही अॅप/वेबसाइट लाँच करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत खंबीरपणे साथ देण्यासाठी नवनीत कटिबद्ध आहे. नवनीत डिजिबुकचे प्रकाशन यशस्वीपणे होईल आणि विद्यार्थ्यांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे.”
हेही वाचा तुम्ही जुनी गाडी वापरताय का? तुमची गाडी भंगारात जाणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय वाचा News

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close