Subscribe to our Newsletter
Loading
सामाजीक/विचार/सुविचार

नालंदा लांडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

सिल्लोड/प्रतिनिधी

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त नालंदा सुंदरराव लांडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२० बुधवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे.माणुसकी चा चौथा वर्धापनदिनाच्या  कार्यक्रमाची रूपरेषा-  दुपारी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रत्त पेढि साठि- ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार  आहे.समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी संपूर्ण नाव नालंदा सुंदरराव लांडगे पद:-सहाय्यक पोलीस निरीक्षक नेमणूक :-सिल्लोड शहर पोलीस स्टेशन,औरंगाबाद ग्रामीण शिक्षण :- B.Tech (Food Tech), M. A (सायकॉलॉजी) डिप्लोमा इन योगा.सन 2011 :- M.P.S.C मार्फत पहिल्याच प्रयत्नात पोलीस उप निरीक्षक (PSI) म्हणून निवड. पहिली पोस्टिंग :-पुणे शहर,दुसरी पोस्टिंग :-सहा. पोलीस निरीक्षक प्रमोशन वर जालना जिल्हा (कदीम जालना पोलीस स्टेशन) आणि दामिनी पथक. पोलीस दलात रुजू झाले पासून महिला व मुलींच्या अत्याचारा विषयी गंभीर गुन्ह्यांचा सखोल तपास करून न्याय मिळावा, म्हणून प्रयत्न करत असते. दामिनी पथक जालना जिल्हा इन्चार्ज म्हणून काम करत असताना मुलींना आत्मनिर्भर व निडर होण्यासाठी सदैव मार्गदर्शन केले. प्रत्येक शाळा व महाविद्यालयात जाऊन मुलींचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मार्गदर्शन करून “नारी सबसे भारी”असा विश्वास दिला.लॉकडाऊन मध्ये सिल्लोड येथे कार्यरत असताना बेघर, वेडसर आणि अपंग व्यक्तींना फुड पाकीट मध्ये अन्न, चहा, पाणी दिले, गोर-गरीब लोकांना शोधून घरपोच जाऊन धान्य वाटप केले.अश्या या आदर्श नालंदा सुंदरराव लांडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर यांना माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कार निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यानी कळविले आहे.ह्या पुरस्काराबद्दल नालंदा सुंदरराव लांडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर यांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close