Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

माझी वसुंधरा ” या अभियानाची शिवसेना युवती सेनेच्या शितल देवरुखकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सुरुवात


संभाजीनगर :पर्यटन व पर्यावरण मंत्री युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ” माझी वसुंधरा ” हे अभियान राबविण्यात येत आहे या अभियाना ची सुरुवात आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ संभाजीनगर येथे युवती सेनेच्या महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य शीतल देवरुखकर व शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली यावेळी युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ युवती सेना जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जैस्वाल, पर्यावरण खात्याचे प्रादेशिक अधिकारी डॉक्टर प्रवीण जोशी , क्षेत्र अधिकारी राजेश औटी, रवींद्र जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के.जी डेकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

निसर्गाचा ऱ्हास होणार नाही निसर्गाचे संवर्धन व संरक्षण करण्याची फक्त शासनच नाहीतर आपली पण जबाबदारी आहे आपण पण यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे संभाजीनगर येथे माझी वसुंधरा या अभियानाची वृक्षारोपण करून या सुरुवात
करत यापुढेही मोठ्या स्तरावर हा उपक्रम राबवणार असल्याचे युवती सेनेच्या शीतल देवरुखकर यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे म्हणाले की *”माझी वसुंधरा” हा कार्यक्रम पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतील अतिशय स्तुत्य उपक्रम असून ही जमीन नसून ती आपली वसुंधरा आहे त्यामुळे हीच संवर्धन करणे काळजी घेणे आपली सर्वांचीच जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी सर्वांनी मिळून पार पाडली पाहिजे.
पर्यावरण खात्याचे अधिकारी वर्ग हा उपक्रम चांगल्या रीतीने राबवत असून हा उपक्रम पर्यावरण खात्या पुरता मर्यादित न राहता हा जनतेचा व्हावा आणि ती जनतेपर्यंत घेऊन जाण्याची संकल्पना या माझी वसुंधरा माझी जबाबदारी या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका,जिल्हा परिषद च नव्हे तर सर्व शाळा , शिक्षण विभाग या सगळ्यांच्या मार्फत माजी वसुंधरा हा उपक्रम जना जनात मना मनात रुजवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आमदार अंबादास दानवे सांगितले.
पर्यावरण विभागाचे वरिष्ठ लिपिक राजू बोडखे ,मुख्य लेखापाल उमाकांत नाईक कनिष्ठ वैज्ञानिक सहायक सुनील साळवे महेश वळसे सौ गीता देशमुख अतुल पैठणे एनजीओच्या अधिकारी श्रीमती गीतांजली कौशिक एमजीएम युनिव्हर्सिटीचे डॉक्टर अरविंद चेहल ,एन एच के प्लांट च्या श्रीमती भारती आहीरे, शिवसेनेचे पदाधिकारी प्रा. संतोष बोर्डे अभिजीत पगारे विशाल सानप मनोज उबाळे ,युवती सेनेच्या निकिता बरथूने निशा पाटील पूनम पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close