Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

माझे विद्यार्थी,माझे दैवत..

माझे विद्यार्थी,माझे दैवत..माझी शाळा औद्योगिक वसाहतीत असलेली.विद्यार्थ्यांचे पालक विविध उद्योग समूहांमध्ये कामगार म्हणून काम करीत आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेला सुरळीत ठेवण्यासाठी रोज आठ दहा तास प्रचंड मेहनत घेणारे पण तितकेच कुशल, बुद्धिमान, जागरूक आणि चौकस.पर्यायाने त्यांचे पाल्यही तसेच बुद्धिमान, मेहनती.कोरोनाचा संपूर्ण विश्वाला भयंकर विळखा पडला आणि लाॅकडाऊन सुरू झाले आणि विद्यार्थी घरी राहून निष्क्रिय होतील कि काय? याची भिती वाटू लागली.त्यामुळेच सगळीकडे आॅनलाईन अभ्यासतंत्राचा अवलंब आपल्यालाही करता येईल का? याचा विचार मनात आल्याबरोबर सर्व शिक्षकांशी चर्चा केली आणि अनुकुलता पाहून सर्व विद्यार्थ्यांचे वर्गांनुसार व्हाट्स अॅपवर ग्रुप तयार झाले.बघताबघता शिक्षकांचे अध्यापन लिखित स्वरूपात देणे, व्हिडिओ तयार करून पाठवणे, लिंक्स पाठवणे, आॅनलाईन टेस्ट तयार करणे असे प्रयोग सुरू झाले आणि फक्त आठवडाभरातच सर्वच  शिक्षक स्वत: ला तंत्रस्नेही बनवण्यात यशस्वी होऊ लागले.मला आनंद होत आहे कि एक महिन्यापासून आमचे आॅनलाईन अध्यापन सुरू झाले आणि पालक आणि विद्यार्थी यांच्या अतिशय चांगल्या प्रतिक्रिया येवू लागल्या.विद्यार्थी स्वयंअध्ययन करू लागले.ज्ञानलालसा,ज्ञानामृत प्राशन तृष्णा निर्माण झाली.व काही विद्यार्थी तर अधिकाधिक प्रश्र्न आम्हाला दर्या,आम्हाला सोडवायचे आहेत अशी मागणी करू लागले.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे विद्यार्थी व शिक्षक या निराशाजनक,हतबल,मानसिक ताणतणावाच्या परिस्थितीत स्वत: ला सक्रिय,उत्साही ठेवू शकले..
(टिप..-सबधीत लेखाशी ,एम एच20लाईव्ह नेटवर्क, एम.एच20लाईव्ह , जबाबदार नाही, लेखकच जबदार आसेल. )

सौ .सुरेखा शिंदे , मुख्याध्यापिका स्व .भैरौमल तनवानी विद्यामंदिर , बजाजनगर , औरंगाबाद .

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close