Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

हातोड्याने वार करत केला परप्रांतीयाचा खुन – पाच तासात आरोपी गजाआड 

पैठण शहरातील फकीरवाड्यातील घटना 

पैठण / किरण काळे
पैठण शहरात दिवसभर हातगाडीवर कुल्फी विकणाऱ्या परप्रांतीयाचा शेजाऱ्याने हातोड्याने वार करत खुन केल्याची घटना आज दि.२३ मे रविवार रोजी सकाळी उघडकीस आली.घटनेतील आरोपी फरार झाला होता पैठण पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवुन आरोपीला ५ तासात गजाआड केले आहे.आरोपी करिम शहा याने गुन्ह्याची कबुली दिली असुन त्याच्यावर ३०२ कलमान्वये पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पैठण शहरातील शासकीय विश्रामगृह रोडवरील फकीरवाडा परिसरात मयत परप्रांतीय कुल्फी विक्रेता मायाशंकर प्रजापती (वय ४५ वर्षे) हा गेल्या अनेक वर्षांपासुन तिथला निवासी असुन त्याचे स्वतःच्या मालकीचे घर देखिल आहे.हातगाडीवर दिवसभर शहरात फिरून कुल्फी विकुन तो आपल्या परिवाराची उपजिवीका भागवतो.मयत मायाशंकर प्रजापती यांंच्या शेजारी राहत असलेल्या करिम शहा (वय ३५ वर्षे ) यांच्यात किरकोळ कारनातुन नेहमी खटके उडत होते.या भांडणाचे रूपांतर रविवारी खुनात झाले.मायाशंकर हा सकाळी कुल्फीची हातगाडी काढत असतांना त्याच्या तोंडावर करिमने हातोड्याने वार करत त्याला गंभिर जखमी केले होते.घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता.जखमी मायाशंकर प्रजापतीला आजुबाजुच्या नागरिकांनी पैठण शासकीय घाटी रूग्णालयात दाखल केले.प्रकृती अधिक गंभिर असल्यामुळे डाँक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला औरंगाबाद घाटीत पाठविण्याचा सल्ला दिला माञ त्याचा रक्तश्राव अधिक झाल्यामुळे प्रजापती यांची वाटेतच प्राणज्योत मालवली.पैठण पोलीसांनी अवघ्या पाच तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.हि कामगीरी पोलीस उपविभागिय अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार,स.पो.नि.गजानन जाधवउपनिरीक्षक साहेबराव गिरासे,रामकृष्ण सागडे यांनी केली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे हे करित आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close