Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

कु. सुनयना दवणे या उच्चविद्याविभूषित तरुणीने ग्रामपंचायत निवडणुकीत मारली बाजी

मंठा / अनिल बा खंदारे

मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी कु. सुनयना शेषनारायण दवणे या उच्चशिक्षित तेवीस वर्षीय तरुणीची निवड झाली आहे. एम एस्सी शिक्षण पूर्ण करून आपले वडील शेषनारायण उर्फ एन. डी. दवणे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतची निवडणूक लढविली कु. सुनयना उच्चविद्याविभूषित असल्यामुळे गावाचा निश्चितच सर्वांगीण विकास होईल यादृष्टीने गावकऱ्यांनी बहुमताने निवडून आणले, कु. सुनयना यांचे वडील एन. डी. दवणे हे माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर आणि भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते आहेत. 2017 मध्ये श्री लोणीकर यांनी त्यांना मंठा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष करून हलाखीचे जीवन जगणाऱ्या गोरगरीब, विधवा, अपंग वयोवृद्ध लोकांची सेवा करण्याची संधी दिली. त्यांनी आपल्या कार्यकाळात तालुक्यातील पाच हजार पाचशे लाभार्थ्यांना निराधार योजनेच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. केहाळ वडगाव तालुक्यात आदर्श गाव करण्याचा संकल्प कु. सुनयना यांनी केला त्यांच्यासोबतच भाजपा पॅनलचे सौ. इंदुमती सुंदर दवणे, सौ. अलका बालासाहेब दवणे, तसेच 22 वर्षीय तरुण उमेदवार भीमराव भगवान खरात विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांचा सत्‍कार माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केला. गावकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही कु. सुनयना शेषनारायण दवणे यांनी दिली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close