Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

‘एमपीएससी’चा निकाल वादाच्या भोवऱ्यात, विनोद पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

निकालात अनियमितता असल्याचा गंभीर आरोप

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) नुकताच जाहीर करण्यात आलेला निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी एमपीएससीच्या निकालात अनियमितता असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून निकाल पुन्हा तपासण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’ निकालाचा पेच भविष्यात वाढणार असल्याचे दिसत आहे.आयोगाने एमपीएससीच्या निकालात जुन्याच अधिकाऱ्यांची त्याच पदावर निवड केल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. या निकालात जवळपास 30 अधिकाऱ्यांना नव्या निकालात जुन्याच ठिकाणी नियुक्ती दिल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रश्नावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विनोद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे, “’एमपीएससी’च्यावतीने 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

राज्याला नवे अधिकारी मिळाले. परंतू यात एक नैराश्य आणणारी बाब म्हणजे यातील 30 पेक्षा अधिक अधिकारी राज्य सरकारच्या सेवेत रुजू आहेत. या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा 2019 च्या लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षांमध्ये भाग घेतला आणि उत्तीर्ण झाले. मात्र, जे अधिकारी आधी उपजिल्हाधिकारी होते, ते पुन्हा उपजिल्हाधिकारी झाले. जे तहसीलदार होते ते पुन्हा तहसीलदार झाले. यामुळे राज्य सरकारचा वेळ वाया गेला. परीक्षेचा खर्च वाया गेला. यातून महाराष्ट्र लोकसेवा आयोग अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे.” “परीक्षा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी पुन्हा पुन्हा अशा प्रकारे एकाच पदाकरता परीक्षा देऊन शासनाची दिशाभूल न करणे ही त्यांची नैतिकता आहे. परंतू तसे घडले नाही. आधीच अनेक निकाल उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनी आपल्या स्तरावर याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आदेश द्यावेत. तात्काळ हा निकाल सुधारित व्हावा. यामध्ये 30 पेक्षा अधिक नव्या युवकांना अधिकारी होण्याची संधी मिळेल. उच्च पदावर जाण्याची संधी मिळेल. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी,” अशी मागणी विनोद पाटील यांनी केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close