Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

कंत्राटी कामगारांचे जमिनीत कमरेपर्यंत गाडून आंदेलन

नाशिक : प्रशासनाचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्र्यंबकेश्वरमधील कंत्राटी सफाई कामगारांनी स्वत:ला जमिनीत कमरेपर्यंत अर्ध गाडून घेत आंदेलन केले. वारंवार मागणी करुनही प्रशासन कंत्राटी सफाई कामगारांच्या मानधनाच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत असल्याने या कामगारांनी स्वत:ला कमरेपर्यंत जमिनीत गाडून घेतले.
गेल्या अनेक दिवसांपासून त्र्यंबकेश्वर नगर परिषद मधील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर आहे. अगदी तोडक्या मानधनात हे कर्मचारी काम करत आहेत. वारंवार मागणी करूनही प्रशासन आपल्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्यामुळे आज या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःला कमरेपर्यंत जमिनीत गाडून घेत आंदोलन केले. अवघ्या 3 ते 4 हजारांत काम करा, अन्यथा घरी बसा, असे सांगितल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. “कोरोनाच्या या महामारीत आम्ही जीव धोक्यात घालून काम करत असतानाही इतक्या कमी मानधनात काम कस करायचे”, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या आंदोलनात प्रहार संघटनेने ही सहभागी होत संबंधित कंत्राट दाराचा आणि त्यात हस्तक्षेप करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी अनेक सफाई कामगारांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आता त्र्यंबकेश्वर प्रशासन या कामगारांच्या मागण्या पूर्ण करणार का, याकडे सध्या या कर्मचाऱ्यांचे लक्ष  लागले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close