Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

एक हजारहून अधिक चिनी सैनिक आम्ही फक्त 250, जखमी झालेल्या जवानाने सांगितला गलवान घाटीतला थरार


नवी दिल्ली | लडाखच्या गलवान घाटीत भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित चकमकीत भारतीय सेनेच्या एका अधिकाऱ्यासह 20 जणांना वीरमरण आलं. या घटनेनं संपुर्ण देशात चीनच्या कुरापती विरोधात संतापाची लाट उसळली. चीनने एकीकडे चर्चेतून मुद्दा सोडवू असं म्हंटल्यानंतर परत एकदा पाठीवर वार केला. चीनच्या वाढत्या कुरापती लक्षात घेता भारतीय जवानही सज्ज झाले. दरम्यान भारतीय जवान आणि चीनी सैनिकांच्या चकमकीत गंभीर जखमी झालेले जवान सुरेंद्र सिंह यांच्यावर लडाखच्या सैनिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तब्बल 12 तासाच्या उपचारानंतर आता ते ठिक आहेत. त्यांनी गॅलन व्हॅलीमधील संपूर्ण घटनेविषयीचा थरार सांगितला. प्रथमच एखाद्या जखमी व्यक्तीने चीनने कसा कट रचला होता हे सांगितले.

नेमकं काय घडलं होतं त्या रात्री?

जवान सुरेंद्रसिंग म्हणाले की, चीनी सैनिकांनी गलवान खोऱ्यातून उगम पावणाऱ्या नदीजवळ भारतीय सैनिकांची फसवणूक केली. या नदीजवळ 1 हजाराहून अधिक चीनी सैनिकांनी 200 ते 250 च्या संख्येत असलेल्या भारतीय सैनिकांना घेरले. चीनी सैनिकांच्या हातात काटेरी तारांनी वेढलेली, तसेच खिळे लावलेली हत्यारे होती. या तीक्ष्ण हत्यारांनी चीनी सैनिकांनी भारतीय जवानांवर अचानक हल्ला केला. त्यानंतर दोनही सैनिकांमध्ये नदीत सुमारे 4 ते 5 तास रक्तरंजित संघर्ष झाला. यामध्ये 200 ते 250 भारतीय सैनिकांनी चीनच्या 1 हजाहून अधिक सैनिकांचा मुकाबला केला. त्यात अनेक भारतीय जवान गंभीररित्या जखमी झाले. मात्र त्यांनी हार न मानता चीनी सैनिकांशी लढा सुरूच ठेवला. चीनच्या 40 हून अधिक सैनिकांचा भारतीय जवानांनी यावेळी खात्मा केला तर कित्येक जवानांना गंभीररित्या जखमी केले. गलवान घाटीत मोठ्या प्रमाणात थंडी आहे. या थंडीमध्ये नदीच्या थंड पाण्यात हा संघर्ष सुरू होता. ज्याठिकाणी हा संघर्ष सुरू होता. त्या ठिकाणी भारतीय सैनिकांना बाहेर निघण्यास जागा नव्हती अगदी एकाच वेळी एकच सैनिक नदीतून बाहेर निघू शकत होता. अशावेळी चीनी सैनिकांचे लोंढेच लोढें भारतीय जवानांवर तुटून पडत होते. तरीही भारतीय जवानांनी हार न मानता चीनी सैनिकांशी मुकाबला केला.

चार ते पाच तास झालेल्या या चकमकीत भारताचे अनेक जवान जखमी झाले. चीनला सुद्धा यामध्ये मोठे नुकसान झाले. चीनने लपून केलेल्या या हल्ल्यामुळं भारतीय सैनिकांना सावरण्यासाठी वेळ भेटला नाही. अन्यथा भारतीय सैनिकही चिनी सैनिकांना अधिक चांगला धडा शिकवू शकले असते असं जखमी जवान सुरेंद्रसिंग सांगतात. या चकमकीत जवान सुरेंद्रसिंग हे सुद्धा गंभीररित्या जखमी झाले त्यांचा एक हात फॅक्चर झाला. डोक्यात 10 ते 15 टाके पडले आहेत. जखमी झाल्यानंतर ते 5 फूट खोल पाण्यात पडले होते. चीनी सैनिकांनी पळ काढल्यानंतर इतर भारतीय सैनिकांनी गंभीर जखमी झालेल्या आपल्या जवानांना बाहेर काढले. लडाखच्या रुग्णालायात आल्यानंतर सुमारे 12 तासांनंतर सुरेंद्रसिंग यांना जाग आली. या भांडणात सुरेंद्रसिंग यांचा मोबाइल व इतर कागदपत्रेही नदीच्या पाण्यात कोठेतरी पडली.

जाबाज जवान सुरेंद्र सिंह हे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील नौगावा गावचा रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांचं कुटुंब चिंतीत आहे. परंतु लडाखमध्ये इस्पितळात दाखल झालेल्या सुरेंद्रसिंग यांच्याशी फोनवरून कुटुंबातील सदस्यांशी बोलल्यानंतर ते दोघे कुटुंबियांच्या जीवात जीव आला. या घटनेत जखमी झालेले सर्व सैनिक लवकर बरे व्हावे यासाठी त्यांच्या परिवारांकडून प्रार्थना केली जात आहे. जखमी जवान सुरेंद्रसिंग यांची पत्नी अलवर येथील सूर्य नगर नाई बस्ती येथे मुलांसह राहते. जखमी जवानचे आई-वडील व भावाचे कुटुंबीय गावात राहतात.

जवान सुरेंद्र सिंह सांगतात की कोणत्याही देशातील सैनिकांशी सामना करण्यासाठी भारतीय सैनिक सदैव तत्पर असतात. सैनिक सुरेंद्रसिंग यांचे वडील बलवंतसिंग म्हणाले की, बुधवारी दुपारी त्यांचा फोन आला, तेव्हा त्यांच्या मुलाच्या डोक्यात चकमकीत दुखापत झाल्याचे सांगण्यात आले व आता तो पूर्णपणे ठीक आहे. परंतु कुटुंबीय देखील त्याच्या प्रकृतीबद्दल चिंताग्रस्त आहे आणि तेथे जखमी झालेल्या सैनिकांना देवाने लवकर बरे करावे अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close