मोज ऑडिशन्सच्या माध्यमातून यूफोनीला १.२ दशलक्ष व्हिडिओ प्रवेशिकांमधून इंडियाज गॉट टॅलेण्टच्या वाइल्डकार्ड फेरीमध्ये मिळाले यश
मोजकडून सोनीच्या इंडियाज गॉट टॅलेण्टसोबत त्यांच्या वाइल्डकार्ड फेरीच्या विजेत्याची घोषणा केल्यानंतर #मोजबनाहिटहोजा चा शुभारंभ
औरंगाबाद – मोज या भारताच्या पहिल्या क्रमांकाच्या शॉर्ट व्हिडिओ अॅपने इंडियाज गॉट टॅलेण्ट (आयजीटी) सीझन ९ चे वाइल्डकार्ड ऑडिशन्स आयोजित करण्यासाठी सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनसोबत सहयोग केला. वाइल्डकार्ड ऑडिशन्समध्ये प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला, जेथे २ लाखांहून अधिक क्रिएटर्सनी सहभाग घेतला आणि जवळपास १.२ दशलक्षहून अधिक व्हिडिओजची निर्मिती करण्यात आली. हिंदी-रॉक एक्स्पेरिमेण्टल बॅण्ड – यूफोनी वाइल्डकार्ड फेरीमध्ये यशस्वी ठरला. मोहिमेचा हॅशटॅग #इंडियाजगॉटटॅलेण्ट ला देखील अॅपवर जवळपास १५ अब्ज व्हिडिओ प्ले मिळाले. वाइल्डकार्ड फेरीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर मोज सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनसोबत सहयोगाने #मोजबनाहिटहोजा लाँच करत आहे. #मोजबनाहिटहोजा च्या विजेत्यांना ५ लाख रूपयांचे रोख पारितोषिक आणि इंडियाज गॉट टॅलेण्टच्या सेटला भेट देण्याची संधी मिळेल. या चॅलेंजला ८ एप्रिलपासून सुरूवात होईल.
देशभरातील सर्वोत्तम कलाकारांच्या लाखो ऑडिशन व्हिडिओंचे स्क्रिनिंग केल्यानंतर यूफोनीला वाइल्डकार्ड फेरीचा विजेता म्हणून घोषित करण्यात आले. चाहत्यांचे प्रेम व प्रशंसेमुळे बॅण्ड आयजीटीमध्ये परतला आहे. यूफोनीने शोचे परीक्षक किरण खेर, शिल्पा शेट्टी कुंद्रा, किंग बादशाह व मनोज मुंताशीर यांना त्यांच्या उल्लेखनीय परफॉर्मन्ससह प्रभावित केले होते. त्यांना शोच्या ग्रॅण्ड प्रिमिअरमध्ये पहिला गोल्डन बझर मिळाला होता.
यूफोनीचा प्रमुख गायक सानिश नायर म्हणाला, ”शेवटी सर्वकाही चांगले झाले आहे. एखादी गोष्ट संपादित करण्यासाठी तन-मन तल्लीन झाले असेल तर ते संपादित करण्यासाठी आपोआप मार्ग सापडतात. आमच्यावर आमच्या शुभचिंतकांनी केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळेच यूफोनी शोमध्ये अधिक प्रबळपणे परतला आहे. मोजवरील वाइल्डकार्ड ऑडिशन्स आमच्यासाठी सुवर्णसंधी होती आणि आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही त्याच दिशेने यश साध्य केले.”
प्रतिभावान आर्टिस्ट्सचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवत मोज व सोनीने सहयोगामध्ये वाढ केली आहे आणि नवीन हॅशटॅग स्पर्धा #मोजबनाहिटहोजा ची घोषणा केली आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी युजर्सना हॅशटॅग #मोजबनाहिटहोजा चा वापर करत त्यांची प्रतिभा दाखवणारे व्हिडिओज मोजवर अपलोड करणे आवश्यक आहे. सहभागींना ५ लाख रूपयांचे रोख पारितोषिक जिंकण्याची, इंडियाज गॉट टॅलेण्टच्या सेटवर येण्याची, सेलिब्रिटीजना पाहण्याची आणि लाइव्ह परफॉर्मन्स पाहण्याची संधी आहे.
शेअरचॅट व मोजचे मुख्य व्यावसायिक अधिकारी अजित वर्घीस म्हणाले, ”मोजवरील वाइल्डकार्ड ऑडिशन्सना २ लाख सहभागींनी विभिन्न भाषा व स्वरूपांमध्ये १.२ दशलक्ष व्हिडिओज निर्माण करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिसण्यात आला. भारतीय तरूण त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या मर्यादित संसाधनांसह त्यांची प्रतिभा दाखवण्यामध्ये उत्साही व सर्जनशील आहेत. मोजमध्ये आमचा विविध पार्श्वभूमींमधील क्रिएटर्सना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी व प्रसिद्धी मिळवण्यासाठी विविध संधी देण्यावर विश्वास आहे. इंडियाज गॉट टॅलेण्ट आमच्या सर्व क्रिएटर्ससाठी अशाच प्रकारची मोठी संधी आहे.”
विजेते व सहभागींबाबत बोलताना अजित पुढे म्हणाले, ”मी वाइल्डकार्ड फेरीमध्ये विजयी ठरलेल्या यूफोनीचे अभिनंदन करतो आणि आम्ही त्यांना त्यांच्या आगामी प्रवासासाठी शुभेच्छा देतो. वाइल्डकार्ड ऑडिशन्सना भव्य यश मिळाल्यानंतर आम्हाला सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनसोबत सहयोगाने #मोजबनाहिटहोजा सादर करण्याचा आनंद होत आहे आणि आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा करतो.”
सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाच्या अॅड सेल्स, नेटवर्क चॅनेल्सचे प्रमुख श्री. संदीप मेहरोत्रा म्हणाले, ”मोजवर इंडियाज गॉट टॅलेण्टच्या वाइल्डकार्ड ऑडिशनच्या यशस्वी पूर्ततेसह आम्हाला ब्रॅण्डसोबतचा सहयोग सुरू ठेवण्याचा आनंद होत आहे. आम्ही वाइल्डकार्ड फेरीचे विजेते यूफोनीचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आमचा अशा मोठ्या प्रॉपर्टीशी संलग्न असलेले आमचे सहयोगी मोजसाठी मूल्य निर्मिती करण्याचा प्रयत्न होता. वाइल्डकार्ड यंत्रणा मोज अॅपच्या माध्यमातून प्रेक्षकांचा सहभाग निर्माण करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयत्न होता. अॅपवरील डाऊनलोड्सच्या वाढत्या प्रमाणाच्या माध्यमातून सहभागामध्ये वाढ आमच्या सहयोगाच्या ख-या यशाला सादर करते. वाइल्डकार्ड ऑडिशन्सना मिळालेल्या यशानंतर आम्ही इंटरअॅक्टिव्ह कॉन्टेस्ट डिझाइन केली आहे, जेथे प्रेक्षक व मोज समुदाय पुन्हा एकदा अॅपवर त्यांची प्रतिभा दाखवू शकतात आणि सर्वोत्तम प्रतिभेला आयजीटीच्या सेटला भेट देण्यासोबत रोख पारितोषिके जिंकण्याची देखील संधी मिळू शकते. आम्ही अशा संबंधित व परस्परपूरक सहयोगांना अधिक पुढे घेऊन जाण्यास उत्सुक आहोत.”
२०१५ मध्ये इंटरनेट सेन्सेशन सनिश नायरने स्थापना केलेल्या या बॅण्डमध्ये भावेश शर्मा (बीटबॉक्सर), रवीकिरण नन्नावरे (बासरीवादक), सिद्धार्थ कुलकर्णी (कीबोर्डवादक), आदित्य काळे (गायक), ओमकार रसाळ (ड्रमवादक), जोशुआ राजन (बास गिटारवादक) आणि रूपेश शिरसाट (प्रमुख गिटारवादक) आहे. बॅण्ड एक्स्पेरिमेण्टल हिंदी रॉक म्युझिक सादर करतो आणि नुकतेच इंडीपेंडण्ट म्युझिकमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी काजोल अभिनीत चित्रपट ‘हेलिकॉप्टर ईला’साठी गाणे ‘तेरी जिंदगी’ संगीतबद्ध करण्यासोबत गायले.