Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

मनसे नेते अमित ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या भेटीला

mh20live Network

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. ‘जेतवन’ या  शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत कोरोनाबद्दल चार प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली.
अमित ठाकरे यांनी डॉक्टरांच्या मानधनात कपात होणार नाही, याची काळजी घ्यावी. अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले होते. राज्यात कोरोना आणि अन्य उपचारासांठी जी रुग्णालय कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरिकांना कळावी यासाठी एक अॅप विकसित करावे., बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी आणि बंधपत्रित अधिपरिचारिका यांच्या पगारातील कपात रद्द करून त्यांचा पगार पूर्ववत करावा., प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यायलाच हवी., प्रत्येक रुग्णालयात पोलिस कर्मचाऱ्यांसाठी काही बेड्स आरक्षित ठेवावेत. तसेच त्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनानेच करावा., या बैठकीत या चार मुद्द्यांवर अमित ठाकरे आणि राजेश टोपे यांनी सविस्तर चर्चा केली. अमित ठाकरे यांनी मांडलेल्या या सर्व विषयांवर राजेश टोपे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच हे सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्वासनही राजेश टोपे यांनी अमित ठाकरेंना दिले. दरम्यान यापूर्वी कोरोनाविरोधाच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या पगारात कपात केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. “महाराष्ट्र सरकारच्या 20 एप्रिल 2020 रोजी काढलेल्या आदेशानुसार बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मासिक मानधन 55 हजार ते 60 हजार रुपये इतके आहे. याशिवाय अधिकाऱ्यांना ‘सेवार्थ प्रणाली’ अंतर्गत मिळणारे मासिक वेतन आणि भत्ते मिळून 78 हजार रुपये इतके मानधन मिळते. मात्र, नव्या आदेशानुसार या अधिकाऱ्यांचे मानधन ‘कंत्राटी सेवा’ अंतर्गत निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या मानधनात 20 हजार रुपये इतकी कपात करण्यात आली आहे. या तरुण डॉक्टरांच्या मानधनातील कपात अन्यायकारक आहे”, असे अमित ठाकरे या पत्रात म्हणाले  होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close