Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मनसेतर्फे दिव्यांगाना मास्क, अरसिक अल्बम औषधी, अन्नधान्य वाटप ; पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष अशोक पवार पाटील यांचा पुढकार

MH20LIVE NEWTORK

औरंगाबाद | दि. २५औरंगाबादेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत असल्याने गोर-गरीब सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या गोर-गरीब नागरिकांना अन्न-धान्याची मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुकुंदवाडी परिसरात दिव्यांग गरजूंना मास्क, अरसिक अल्बम औषधी, सानीटायझर, तसेच अन्नधान्य किराणा साहित्याचे वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष अशोक पवार पाटील यांनी पुढाकार घेतला.
गेल्या तीन महिन्यापासून शहरात संचारबंदी करण्यात आली आहे. अनलॉक १ सुरु झाले असले तरी अजूनही जनजीवन सुरळीत झाले नसल्याने नागरिकाना दैनदिन आवश्यक असणाऱ्या किराणा वस्तूंची निस्वार्थ हेतूने मदत करण्यात आली. मुकुंदवाडी परिसरातील दिव्यांग गरजूंना हि मदत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक मोतीलाल जगताप, बाबासाहेब डांगे, सुनील जगताप, शाहूराज चित्ते, सचिन अंभोरे, हनुमान शिंदे, रवींद्र गायकवाड, दादाराव जगताप, कचरू वीर, कृष्णा लोखंडे , रुपेश शिंदे, क्षितीज हिवाळे, निलेश कावडे, गणेश दहिहंडे, संदीप मिसाळ, संदीप काळे, शेखर पाटील यांची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close