Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

सोयाबीन सीड कंपन्या विरूध्द गुन्हे दाखल करा : आ.सोळंके यांच्या कृषी विभागाच्या अधिकार्यांच्या बैठकीत सुचना

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

माजलगाव /रविकांत उघडेमाजलगाव मतदार संघातील माजलगाव, धारूर व वडवणी तालुक्यातील सोयाबीनच्या निकृष्ठ बियान्याबाबत आज दि.8.7.2020  रोजी उपविभागीय कृषी अधिकारी, तिन्ही तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी व तिन्ही तालुक्यातील पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये घेतलेल्या आढाव्या मध्ये माजलगाव तालुक्यात 476 शेतकर्यांना सोयाबीनच्या निकृष्ठ बियानाबाबत तक्रारी केल्या असुन त्या पैकी 225 शेतकर्याचे  पंचनामे झालेले आहेत तसेच धारूर तालुक्यात 334 शेतकर्यांना तक्रारी केली असुन त्यापैकी 179 शेतकर्यांचे पंचनामे झालेले आहे व वडवणी तालुक्यात 234  शेतकर्यांनी तक्रारी केली असुन त्यापैकी 169 शेतकर्यांचे पंचनामे झाले आहे. या निकृष्ठ बियाण्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली असल्यामुळे संबंधी अधिकार्याची बैठक घेवुन बैठकीमध्ये इगल सीड,महाबिज, ग्रीन गोल्ड सह 7 कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सुचना आ.प्रकाशदादा सोळंके यांनी उपविभागीय कृषी अधिकारी श्री.मडके व इतर अधिकार्यांना दिल्या तसेच शेतकर्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे व ग्राहक मंचातुन शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवुन देण्याच्या सुचना दिल्या तसेच सोमवार पर्यंत पंचनामे पुर्ण  करण्याचे आदेश देण्यात आले….

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close