Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

वेदांतनगर पोलिसांनी व माणुसकी समुहाने दिला ४८ वर्षीय मनोरुग्ण महिलेला दिला न्याय मानव सेवा तीर्थ चोपडा येथे पुनर्वसनासाठी केले दाखल

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेतर्फे मदतकार्य
औरंगाबाद :आपल्या घरातील स्त्री बाहेर गेली आणि घरी परत यायला तिला उशिर झाला की जीव कासाविस होतो.रात्री अपरात्री काही झालं तर? मात्र ती घरात सुखरूप आल्या नंतर आपली काळजी संपते.घरातल्या चार भिंतींच्या मर्यादेत ती सुरक्षित असते.पण अशाच असुरक्षित व धोक्याच्या कित्येक स्त्रिया रात्री भटकत असतात;ती कुणाची तरी आई, मुलगी,अथवा पत्नी, किंवा बहीण असेल.पण त्यांची वाट पाहणारं असं कुणीच नाही.अशा अनेक महिला ज्यांना त्यांच्या आपल्या लोकांनीच व समाजाने देखील सोडून दिलं आहे.कारण त्या आजारी आहेत मनोविकृत आहेत.वेदांतनगर पोलीस स्टेशन समोरील भागात काही दिवसांपासून मानसिक आजाराने ग्रस्त एक महिला फिरत असून,लोकांना दगड मारने


आपले स्वतः चे डोके जमीनिवर व बंद दुकानांच्या शटर वर जोरजोरात मारने परीस्थिती एवढि भयानक होती कि शटर सुध्दा तीच्या मारन्याने पुर्णपणे वाकले होते.अंगावरचे कपडे फाडने ह्या मानसिक अवस्थेत आहेत.हि बाब पोलीस निरिक्षक सचिन सानप यांच्या लक्षात आली.त्यानी त्या मनोरुग्ण महिलेची चौकशी केली.असता ती आपल्या महाराष्ट्रातील नसून ती एक बेवारस निराधार महिला आहे हे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी आपल्या उपपोलीस निरिक्षक प्रमोद देवकाते यांना माहिती देवुन त्यांच्या पुनर्वसनासाठी काही समाजिक संस्थेचे स्वयंसेवक काम करते का त्यात देवकाते सरांनी सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि माणुसकी रुग्ण समूहाचे सामाजसेवक श्री सुमित पंडित यांना माहिती दिली,असता सुमित पंडित यांनी विविध आश्रमांची विचारपूस केली,त्यात वेले तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील मानव सेवा तीर्थ येथील नरेद्र पाटील यांच्याशी फोन द्वारे संपर्क करुन त्या महिलेला पुनर्वसना साठि मनोरुग्ण सेंटर येथे नेण्याचे ठरवले,कारण असे कळले आहे की दुर्दैवाने औरंगाबाद येथे अश्या मनोरुग्ण महिलांसाठी पुनर्वसनाची काहीच व्यवस्था नाही.त्या महिलेला सुरक्षित पने वेले ता.चोपडा येथे प्रावेट गाडीने नेन्यात आले,

या सामाजिक कार्यात पोलीस निरीक्षक सचिन सानप,रामेश्वर रेंगे पो.निरिक्षक सिल्लोड,व माणुसकी समुहाचे सुमित पंडित,पो.उप निरिक्षक प्रमोद देवकाते,सुधाकर पाटील,शारदा लाटे,उपपोलीस निरिक्षक,अनिल कंकाळ ऐ.पी.आय,व पोलीस कर्मचारी बाळासाहेब ओवांडकर, मंगेश अभंग,सुनिल पांडे,नाना बच्छे,स्वाती बनसोडे,उत्तम जाधव,बाळु अहिरे,कलंदर पठाण,डॉ रंजना प्रशांत दंदे,जिजाभाऊ मिसाळ,जितेंद्र निबाळकर,वेले आश्रमातील नरेंद्र पाटील,अनिरुद्ध चौधरी,नरेंद्र चौधरी,समाजसेविका पुजा पंडित,आदिंनी मेहनत घेतली.

एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मनोरुग्ण महिलेला दिला न्याय

एक सामाजिक दायित्व व कर्तव्य स्वीकारणारे याचं उत्तर माणुसकी शिवाय दुसरं काय असेल.ती महिला मानसिक आजाराने पीडित आहेत.हा त्यांचा गुन्हा आहे का ? समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरिक आत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा प्रश्न ह्या एका महिलांचाच नाही, तर अजून किती असतील.ज्या अशाच अबोध आपल्या देहाला बेसुध मिरवत असतील समाजातील वाईट नजरे सामोर. मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का ? यांना असच उकिरड्यावर ठेवायचे काय ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? हे मनोरुग्ण देखील आधी सामान्य जीवन जगत होते. जीवनात संकट सांगुन येत नसतात.आपण आपल्या मर्यादा जर खरच वाढवल्या आणि मदतीचा हात सामाजिक संस्थाना लावला,जे अशा स्वरूपाचं काम करण्यास उभे होत आहेत.तेव्हा खऱ्या अर्थाने मनोरुग्णाचा मानसिकतेत स्थिरता येईल. आणि समाजाची खरी मानसिक विकृत वृत्ती नष्ट होईल.

सचीन सानप पोलीस नीरीक्षक ,वेदांतनगर पोलीस स्टेशन औरंगाबाद शहर

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close