माजलगाव /रविकांत उघडे
शहरातील काही स्वस्त धान्य दुकाने ही दलालामार्फत चालवली जात आहेत.त्यात माजलगांव तालुका को.ऑप. सोसायटी,सरकारी सोसायटी व एम.एच.काजी या दुकानाचा समावेश आहे.या दुकानदाराने गेली दोन महिन्यापासुन फ्रि चा आलेला माल अजुनही दिलेला नाही. प्रत्येक मालामध्ये एक किलो कमी माल दिला जातो.जर जाब विचारायला गेलो तर माल आला नाही.माहीत नाही तहसिलला चौकशी करा. आम्हाला विचारणारे तुम्ही कोण?असे कार्डधारकाना बोलल्या जाते. हि सर्व धान्य माफीयाची मुजोरी व दलालाची दादागिरी खपवून घेणार नाही असे इशारा राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते राजरत्न खळगे यांनी दिला आहे.सदरिल दुकानाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
सदरील दुकनाची व मालाचा तपशील शासनाने जातीने तपासावा व स्वस्त धान्य दुकान दारांवर योग्य ती कार्यवाही करावी.
अन्यथा लोकशाही मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपल्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा राजरत्न खळगे यांनी दिला आहे.