Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

नागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे

आँनलाईन मतदार नोंदणीत पैठण तालुका आघाडीवर

पैठण / किरण काळे

निवडणूक आयोग कार्यक्रम पत्रिकेनुसार,मतदारांचे डिजीटल निवडणूक ओळख पत्र,e-epic
अँप डाऊनलोड करण्याबाबत नुकतीच पैठण तहसिल कार्यालयात बैठक पार पडली.
ग्रामीण भागात मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांना अनेक चकरा माराव्या लागत होत्या त्यातच कागदपञांची पुर्तता करूनही मतदार यादीत नाव समाविष्ट होत नव्हते.झालेच तर नावात बदल,अक्षर चुकी अशा अनेक अडचणीला सामोरे जावे लागत होते.
माञ निवडणुक आयोगाने आता थेट e-epic या नावाने अँपच तयार केले असुन त्या मध्यमातुन
नागरिकांना स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी तसेच नाव दुरूस्ती करून तात्काळ डिजीटल मतदान कार्ड डाऊनलोड करता येणार असल्याची माहिती नायब तहसिलदार संतोष आनर्थे यांनी आयोजीत बैठकीत मार्गदर्शन करतांना सांगितले.
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पैठण यांंच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार संतोष अनर्थे यांनी दि. ७ व ८ जुलै रोजी तहसील पैठण येथे सर्व तलाठी/ मंडळ अधिकारी,पोलीस पाटील व सर्व स्वस्त धान्य दुकानदार तालुका पैठण यांची बैठक घेऊन मा. निवडणूक आयोग यांच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार, मतदारांचे निवडणूक ओळख पत्र, e-epic अँप डाउनलोड करण्याबाबत बैठक घेऊन, सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले,तसेच संबंधित मतदार यांच्याशी गावात प्रत्यक्ष संपर्क साधून मतदारांच्या मोबाईलवरून डाउनलोड करून त्यास डाउनलोड केलेली प्रिंटकॉपी द्यावी व हे काम येत्या १२ जुलै पर्यंत संपवावे व मतदार नोंदणी बाबत पैठण तालुका आघाडीवर असल्याची माहिती नायब तहसिलदार संतोष अनर्थे यांनीmh20live प्रतिनीधीशी बोलतांनी दिली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close