डिजिटल पेमेण्ट्स सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेचा पाया
: महामारीच्या काळात डिजिटल पेमेण्ट्समध्ये अपवादात्मक वाढ दिसण्यात आली. व्यवहार करण्याच्या सुलभतेमुळे ग्राहकांना डिजिटलचा अवलंब करण्यास प्रेरणा मिळाली आहे. मागील काही वर्षांमध्ये भारताच्या डिजिटल पेमेण्ट्स क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ दिसण्यात आली आहे, जेथे ग्राहक व व्यापा-यांनी डिजिटल अवलंबतेची सोयसुविधा व सुरक्षिततेचा अनुभव घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केलेल्या आर्थिक साक्षरता सप्ताहाशी संलग्न राहत मास्टरकार्डने डिजिटल पेमेण्ट्सने कशाप्रकारे ग्राहकांना सोईस्कर व एकसंधी अनुभव दिला आणि यंदाची थीम ‘गो डिजिटल, गो सेक्युअर’मध्ये योगदान दिले याबाबत माहिती सांगितली आहे.
डिजिटल पेमेण्ट्स ई-कॉमर्सला चालना देणारा सर्वात मोठा स्रोत राहिला आहे. घरपोच सामानांची डिलिव्हरी मिळण्याच्या सुलभ सुविधेने ग्राहकांमध्ये ऑनलाइन ऑर्डर करण्याबाबत, तसेच डिजिटल पेमेण्ट्सचा वापर करण्याबाबत आत्मविश्वास निर्माण केला आहे. तसेच डिजिटल पेमेण्ट्स ग्राहकांना विविध पेमेण्ट पर्याय देत आरामदायी जीवनाचा आनंद घेण्याची सुविधा देतात, जेथे त्यांना सोबत रोख रक्कम ठेवण्याची किंवा एटीएममधून पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासत नाही.
कॉन्टॅक्टलेस कार्डस् टॅप-अॅण्ड-गो, क्यूआर कोड्स इत्यादींसारख्या पेमेण्ट्सच्या नवीन पद्धतींचा अवलंब केल्याने जोखीमांचे निर्मूलन करत डिजिटल पेमेण्ट्स सुलभपणे व सुरक्षितपणे करण्यामध्ये मदत होते. ही आधुनिक तंत्रज्ञान वर्तणूक पद्धतींचे मूल्यांकन करण्यासाठी प्रगत इंटेलिजन्सची सुविधा देतात आणि माहिती अनधिकृतरित्या उपलब्ध करून देण्यासाठी संरक्षण यंत्रणा निर्माण करत ऑनलाइन फसवणूकीला प्रतिबंध करतात. सुधारित तंत्रज्ञान व जागरूकतेसह डिजिटल पेमेण्ट्स लोकांना सुरक्षित, विश्वसनीय व एकसंधी अनुभव देतात. कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशनचे सादरीकरण कार्ड क्रमांकाऐवजी अद्वितीय पर्यायी क्रमांक म्हणजेच ‘टोकन’चा वापर करत डिजिटाइज पेमेण्ट परिसंस्थेमध्ये सुरक्षिततेची भर करेल.
ग्राहकांप्रमाणेच डिजिटल पेमेण्ट्स लघु व्यवसायांसाठी औपचारिक आर्थिक सेवांचा लाभ घेण्याचे गेटवे असतात. त्यांच्या व्यवसाय यंत्रणांमध्ये एकीकृत करण्यात आलेल्या डिजिटल पेमेण्ट्सनी व्यवसायांना डिजिटल पेमेण्ट्ससाठी ग्राहकांच्या बदलत्या पसंतीची पूर्तता करण्यामध्ये, त्यांचा व्यवसाय वाढवण्यामध्ये आणि डिजिटल आर्थिक उपस्थिती विकसित करण्यामध्ये मदत केली आहे. ते डिजिटल आर्थिक उपस्थितीचा वापर करत आर्थिक संस्थांकडून औपचारिकरित्या कर्ज घेऊ शकतात. तसेच डिजिटल पेमेण्ट्सनी पायाभूत सुविधेमधील आव्हानांचे निराकरण करण्यामध्ये, सोयीसुविधा देण्यामध्ये आणि डिजिटल परिसंस्थेमध्ये नवीन व्यवसाय व लघु-व्यापा-यांचा समावेश करण्यासाठी सुरक्षित व सोईस्कर मार्गाची निर्मिती करण्यामध्ये मदत केली आहे.