विशाल जाधव/सिल्लोड
सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये 9 मार्च रोजी सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला असून या अचानक आलेल्या पावसाने गहू,हरभरा,कांदा,बाजरी,मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने पूर्णपणे हिरावून घेतला आहे. तालुक्यातील शिवना,डिग्रस,गोळेगाव,धोत्रा,अजिंठा,या शिवारातील अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक आडवे झाले.
नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा
अनेक शेतकरी या अवकाळी पावसाने हवालदिल झाले आहेत.सकाळी सकाळी झालेल्या या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमा केलेल्या शेतमालात पाणी घुसून जमा केलेले हरभरा व इतर पिके ओली झाली. आता या आडव्या झालेल्या व हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी हीच माफक अपेक्षा बळीराजाची आहे.