औरंगाबाद: लासूरस्टेशन, देवळी येथे नुकतेच तायडे सेंद्रिय कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला, संतोष जाधव, मा. सभापती, बांधकाम समिती, जि.प. औरंगाबाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, यावेळी ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट, जालंधर, पंजाब, भारत,औरंगाबादचे विभागाचे डीलर तथा शेती तज्ञ साहेबराव चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, श्री. मनोज पा. मिसाळ, सभापती, पं. स. वैजापूर यांच्या हस्ते ग्रीन प्लॅनेटच्या माहिती पत्रकाचे विमोचन करण्यात आले, साहेबराव पा. चव्हाण यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन केले, रासायनिक खतांमुळे शेतीचे खुप मोठे नुकसान झाले असून, उत्पन्न घटले आहे, दर्जा घसरला आहे, आता फक्त सेंद्रिय शेती केली तरच जमिनीची हानी भरून निघेल, शेतीचा पोत सुधारून चांगले पीक येईल व उत्पन्न वाढेल, आमचे मार्गदर्शन या भागातील शेतकऱ्यांना मिळेल याची ग्वाही दिली. जाधव साहेब यांनी सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे नसता रासायनिक वाफराने शेती बंजर होईल हा धोका ओळखून आधुनिक पद्धतीने शेती करावी असे आवाहन केले.
तायडे सेंद्रिय कृषी सेवा केंद्रा मुळे लासुरस्टेशन जवळील शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध झाली आहे. या कार्यक्रमास प्रा. संदीपान थोरात, मार्गदर्शक, ग्रीन प्लॅनेट., राजाराम पाटील, वाल्मीक चव्हाण, संचालक, कृ.उ.बा.स. लासुरस्टेशन, रामकिशन तायडे, सरपंच, देवळी, दादा पाटील तायडे, रामनाथ तांबे, यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास अनेक गावातून शेतकरी उपस्थित होते. तायडे सेंद्रिय कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री. एकनाथ पाटील तायडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम घडवून आणला. प्रत्येक गावात सेंद्रिय शेती विषयी जागृती निर्माण करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.