औरंगाबाद : हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेडच्यावतीने तूर खरेदीसाठी 20 डिसेंबरपासून ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना शासनाने ऑनलाईन पीकपेरा नोंदणी ॲपवर करण्याबाबत सूचित केले आहे. नोंदणी करण्याकरीता 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरी शेतकऱ्यांनी शासनाच्या ऑनलाईन ॲपवर ई-पीकपाहणी अपलोड करुन त्यांच्या राहिलेल्या तुरीची पीकपेरा नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केली आहे.
शासनाने सुरु केलेल्या तूर हमीभाव खरेदी केंद्रावर तुरीची ऑनलाईन नोंदणी करुन हमीभावाचा लाभ घ्यावा. नोंदणीची मुदत शासनाने तूर खरेदी करीता किमान आधारभूत खरेदी दर 6300 असून व नोंदणी कालावधी 20 डिसेंबरपासून सुरू झालेला आहे, तर खरेदी 31 मार्चपर्यंत असल्याचे, त्यांनी कळविले आहे.