औरंगाबाद/प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी ) विभागाच्या मुख्यालयात निविदा काढण्यापूर्वीच ३० लाख रुपयांचे काम घाई-घाईत उरकून घेण्याचा अजब प्रकार मंगळवारी, २४ रोजी निदर्शनास आला आहे. खास मर्जीतील एका कंत्राटदारामार्फत अतिवेगात सुरू असलेले काम त्वरित थांबवण्यात यावे, अशी मागणी होत आहे.प्राप्त माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी विविध कामांसाठी ई- निविदा काढल्या आहेत. पदमपुरा येथील कार्यालय परिसरातील रस्त्याची दुरुस्तीसह वीज पुरवठ्याची कामे करण्यासाठी २९ लाख ३१ हजार रुपयांच्या निविदेचा यात समावेश आहे. या कामासाठी निविदा भरण्याची मुदत बुधवार, २५ जानेवारी २०२३ पर्यंत आहे. त्यानंतर निविदा उघडणे, कमी दराच्या निविदेला मान्यता देवून कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देणे अपेक्षित होते. मात्र, निविदा भरण्यासाठी एक दिवसाची मुदत बाकी असताना एका कंत्राटदाराने काँक्रिट रस्त्याचे कामदेखील सुरू केले असून, अर्धेअधिक काम वेगात उरकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यालयातच असे प्रकार होत असतील, तर इतर कामांमध्ये किती मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ असेल, किंबहुना सा. बां मध्ये असे बोगस प्रकार सर्रास केले जात असल्याचा आरोप भीमशक्ती असंघटीत रोजंदारी कामगार संघटनेचे शहराध्यक्ष रणजित मनोरे यांनी केला आहे. याबाबत कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, मात्र संपर्क होवू शकला नाही. * कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकाकार्यारंभ आदेश नसतानाही वेगाने सुरू असलेले काम बंद करण्यात यावे. संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकावे तसेच संबंधित कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता यांच्यावर कारवाईची मागणी रणजित मनाेरे यांनी मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आ