Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देतानाच ठिबक सिंचनासाठी ८० ते ९० टक्के अनुदान देण्याचा प्रस्ताव विचाराधीन-कृषिमंत्री

कृषिमंत्री यांची माहिती; वीज दिवसा उपलब्ध

मुंबईः शेतीत प्रयोग करणारे शेतकरी चालते-बोलते विद्यापीठ असून त्यांच्या अनुभवातून व संकल्पनेतून फलित झालेल्या मॉडेलचा राज्यातील इतर शेतकऱ्यांना देखील लाभ व्हावा यासाठी शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले. ऊर्जा विभागाशी समन्वय साधून शेतीकरिता दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाहीही भुसे यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे कृषीभूषण डॉ. दत्तात्रय वने यांच्या शेतात झालेल्या कार्यक्रमात कृषीमंत्र्यांनी रिसोर्स बँकेतील शेतकरी बांधवांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह राज्यभरातून प्रयोगशील शेतकरी ऑनलाइन सहभागी झाले होते. माझी माय-वडील शेतात राबायचे… शेतकऱ्याच्या कुटुंबात मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमा करताना जे कष्ट करावे लागतात त्या साऱ्याचा मी जवळून अनुभव घेतल्याची आठवण कृषीमंत्र्यांनी यावेळी सांगितली. शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देतानाच ठिबक सिंचनासाठी ८० ते ९० टक्के अनुदान देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

प्रयोगशील शेतकऱ्यांसोबत शेतात प्रत्यक्ष प्रयोग केलेल्या नाविन्यपूर्ण बाबींवर आस्थेवाईकपणे संवाद साधत शेती पीक घेण्याबरोबरच विक्री करण्याची कला अंगीकृत असणे देखील महत्त्वाचे आहे, त्यामुळे ‘विकेल ते पिकेल’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून वाटचाल करणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. यावेळी काही शेतकऱ्यांनी आपल्या समस्याही मांडल्या. त्या समस्या आपण येणाऱ्या काळात मार्गी लावू, असे आश्वासन कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले.

शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी मदतः बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून, शेतकऱ्यांचे गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून, साठवण क्षमता, शीतगृहे, माल वाहतूक, शेतमालावर प्रक्रिया यांना पाठबळ देण्याचे काम कृषी विभागाने हाती घेतलेले आहे. त्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. यावेळी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांच्या विभागनिहाय प्रतिनिधींनी शेतात केलेल्या विविध प्रयोगांची माहिती दिली. राज्यातील अन्य शेतकऱ्यांना प्रशिक्षित करताना त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी मदत करण्याचे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close